चंद्रपूर (डॉ बंडू आकनुरवार)
पद्मशाली समाज,जिल्ह्य पद्मशाली समाज संघटना,महीला समाज व पद्म शाली युवा मंचच्या वतीने महाकाली मंदिराजवळील मार्केडेेय मंदिरात रमेश यंगलवार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजलीसह त्यांच्या समाज कार्याबद्दल मानवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
समाजाचा ध्येयवेडा कार्यकर्ता रमेश येंगलवार !
समाज कार्याचे "ध्येय" असलेले अनेक असतात-दिसतात. परंतु समाज कार्याचे वेड असणारे असे एखादेचं बघायला मिळते, त्यातीलचं एक म्हणजे पद्मशाली समाजाचे "ध्येयवेडे" व्यक्तीमत्व म्हणजे रमेशभाऊ येंगलवार होते. समाजातील लग्नापासून तर मृत्युपर्यंतचे कोणतेही कार्य असो त्या कार्यात रमेशभाऊ ची निस्वार्थ उपस्थिती व मार्गदर्श़न असल्याशिवाय ते कार्य पुढे जायचे नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातील इत्यंभूत माहिती त्यांच्या संग्रही असायची. समाजात कधी काय घडले, काय घडायला हवे होते. हे सारे मुकपाठ असलेल्या रमेशभाऊ वर काळाने आघात केला आणि ते एकाएकी सर्वांना सोडून इहलोकी निघून गेले ते कायमचे ! त्यांच्या जाण्याने समाजात जी पोकळी निर्माण झाली ती कधिही भरून न निघणारी आहे.-राजु बिट्टूरवार, संपादक, साप्ता. विदर्भ आठवडी, चंद्रपूर
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर अल्लेवार होते उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटना तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटना अध्यक्ष डॉ बंडूभाऊ आकनुरवार, सल्लागार सुर्यकांत कुचनवार,सचिव राजू यंगलवार, मोरेश्वर कुरेवार,संतोष वासलवार,हरीभाऊ बिटुरवार, जिल्ह्य संघटक तुळशीदास मारशेट्टीवार, इजि. राजेंद्र कटकमवार, मार्कंडी आकनुरवार, मधुकर चिप्पावार, अजय कोडलेकर, महेश नाडमवार, अध्यक्षा सौ. लताताई तुम्मे, सचिव सौ निता कामनवार, राकेश आईटलावार, रितेश इजमुलवार होते. यावेळी जिल्हा सचिव रमेश यंगलवार यांच्या निधनाबद्दल महाशिवरात्रीनिमित्तचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. स्वर्गीय रमेश यंगलवार समाज संघटन व विकासाबाबतचे कार्य 45 वर्षांपेक्षा अधिक काळ केलेले असुन समाजामध्ये त्यांना चालता बोलता कोषागार समजले जात होते. त्यांच्या दुखःद निधनाबद्दल डॉ चंद्रशेखर अल्लेवार, डॉ बंडूभाऊ आकनुरवार, सुर्यकांत कुचनवार, राजु यंगलवार, सौ लताताई तुम्मे या समाजातील पदाधिकाऱ्यांनी मनोगतात व्यक्त केले. स्वर्गीय रमेश यंगलवार यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या समाज कार्याला मानवंदना देण्यात आली.
0 टिप्पण्या