प्रीती जाधव धारावत हिच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्या! Give death sentence to Preeti Jadhav Dharawat's killer!



समाजसेवक हितेश चव्हाण आणि शिष्टमंडळाची मागणी !

गडचांदूर (प्रति.): प्रीती जाधव धारावत तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील काकती या मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकणारी विद्यार्थिनीला मोहम्मद सैफ नावाच्या तरुणाने प्रथम बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले व ही गंभिर बाब लपवण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने त्याला आत्महत्याचे स्वरूप दिले या अशा कठोर नराधमास व मेडिकल कॉलेज चालवणारे प्रशासनाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी गडचांदूर येथे समस्त समाज बांधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून दोषींना फाशीची शिक्षा व्हावी व मेडिकल कॉलेजचे मान्यता रद्द करण्यात यावी असे निवेदन दिले व प्रीती जाधव हिला श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला समाजसेवक हितेश चव्हाण, संतोष राठोड अभियंता जिल्हा परिषद चंद्रपूर, कनीरामजी पवार उच्च श्रेणी मुख्याध्यापक, कैलास पवार सर, माधव पवार सर, उमेश आडे सर, गणेश करमटोट, श्री विजय राठोड सर, श्री सुनील चव्हाण, श्री नानाजी पांडे, श्री पवनदीप यादव अध्यक्ष हिंदू युवा संघटन चंद्रपूर, श्री सत्यदेवजी शर्मा नेते हिंदू महासभा, श्रीकृष्ण मेथू नेते हिंदू महासभा, श्री राकेश अरोरा हिंदू युवा वाहिनी, श्री मनोज सिंग, श्री महेश घरटे, श्री हेमंत पातुरकर, शंकर कापूरकर , नीरु ताई चव्हाण, पूजा चव्हाण , उषा चव्हाण, ललिता चव्हाण, अमृता पवार, आनंदी राठोड, मंगला जाधव, आरती आडे, शिल्पा चव्हाण, कोमल राठोड, अरुणा राठोड, बबली जाधव, गौरी चव्हाण, गौरव चव्हाण , वेदिका चव्हाण, निकिता पवार, बहुसंख्य बंजारा समाजातील महिला पुरुष श्रद्धांजली सभा या कार्यक्रमाला उपस्थित होते, सर्वांनी मिळून मोहम्मद सैफ नराधमाला , फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी करून दोन मिनिटं मौन पाळून कुमारी प्रीती जाधव हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या