परजिल्ह्यातून दारू दुकाने जिल्ह्यात स्थानांतरणासाठी "रॅकेट" सक्रीय ? "Racket" active for transfer of liquor shops from district to district?


गडचांदुर येथील दारू दुकानाच्या वादानंतर जिल्ह्यात चर्चेला उधाण !!

चंद्रपुर (वि. प्रति. ) : चंद्रपूर जिल्ह्यात ६ वर्षानंतर दारूबंदी हटविल्यानंतर दारू दुकान सुरू करण्याची जणु होड लागली आहे. मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या कंडीशनवर दारू दुकाने जिल्ह्यात लावली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५० च्या जवळपास नविन परमिट रूम ला परवानगी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यामध्ये देशी दारु लावण्यासाठी मुंबई, उस्मानाबाद येथून दारूची दुकाने स्थानांतरित करण्यात येत आहे. नियमांना धाब्यावर ठेवून दारू दुकानांनी परवानगी देण्यात येत असल्याचे चित्र आहे. यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलने, तक्रारी केल्या आहेत. परंतु याचा कोणताही परिणाम राज्य उत्पादन शुल्क विभागाला पडलेला दिसत नाही. चंद्रपूर जिल्हा राज्य उत्पादन विभागाची भुमिका याबाबत संशयास्पद आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात जिल्ह्यात दारुबंदी हटल्यानंतर ४ ते ५ महिन्यात चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अधिक्षक या लाभलेले ही बाब बरीच बोलकी अशी आहे.

चितेगाव येथे बनावट दारू कारखान्याचा  रेकार्डमध्ये असलेला आरोपी पवन उर्फ गोलु वर्मा याला अटक करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला एक महिना लागतो, यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सुचना द्याव्या लागतात, तोच राज्य उत्पादन शुल्क विभाग धडाधड दारूचे परवाने स्थानांतरण करतो, ही बाब फार काही सांगून जाणारी आहे.

*हे सुद्धा वाचा :* 👉👉 बाबुपेठ येथे पुन्हा नविन देशी दारू दुकानाविरोधात महिलांचा एल्गार !

नुकतेच गडचांदुर येथे अर्जदार प्रभाकर शिंदे व सुचिता शिंदे यांचेतर्फे वरोरा येथील सुमित विश्वास यांनी माणिकड चौकाजवळ मो. वाजीद मो. शम्मी यांचे मालकीच्या दुकानात देशी दारु दुकानासाठी परवानगी चा विषय चव्हाट्यावर आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात परजिल्ह्यातून दारूची दुकाने स्थानांतरण करण्यासाठी 'रॅकेट' तर सक्रिय नाही नां? याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमध्ये तथ्य ही असु शकते. कारण यापुर्वी ही चंद्रपूर शहरामध्ये बाबुपेठ परिसरातील बेनार रेल्वे स्टेशनजवळील बुद्धविहाराजवळ मुंबई येथुन स्थानांतरित झालेल्या देशी दारु दुकानाच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर पंधरा दिवसांसाठी सदर दुकान संबंधित विभागाने बंद करून ते पुर्ववत करण्यात आले. जर नियमाने दुकानाचे स्थानांतरण करण्यात आले तर संबंधित विभागाने मौखिक आदेश देऊन हे दुकान बंद कसे केले ? हा संशोधनाचा विषय आहे. तसेच नुकतेच बाबुपेठ येथील बायपास रोडवर उस्मानाबाद येथुन स्थानांतरित झालेल्या दुकानाला परवानगी देण्यात आली आहे. त्या विरोधात बाबुपेठ वासियांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. पुर्वीच दारू दुकानांचे भरमार असतांना ही आता गडचांदुर येथे स्थानांतरित होत असलेले देशी दारुचे दुकान हे मुंबईवरून स्थानांतरण होत असल्याचे कळते. मिळालेल्या माहितीनुसार स्थानांतरित दारू दुकानासाठी नावे करण्यासाठी निर्धारित 'दर' दिल्यास सगळे ओके होत असते. मोठी देवाण-घेवाण यासाठी होत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

परजिल्ह्यातील दारु व्यावसायिकांना जागेच्या उपलब्धतेबद्दल माहिती कशी मिळते ?

मुंबई, उस्मानाबाद सारख्या परजिल्ह्यातून चंद्रपुर जिल्ह्यात दारु दुकाने स्थानांतरित होत असतांना मुळ मालकांना जागेच्या उपलब्धतेबद्दल माहिती कशी मिळते, हा प्रश्न चंद्रपुरकरांसाठी अनुत्तरीत आहे. त्यानंतर ही कार्यालयीन कागदपत्रे सादर करून दारू दुकाने स्थानांतरण करण्यासाठी एखादे मोठे 'रॅकेट' तर सक्रिय नाही नां? या गोष्टीला पुष्टी मिळते. जिल्ह्यात दारूबंदी हटल्यानंतर लिकर लॉबीतील एका धनाढ्याने स्वतःला लिकर लॉबीचा पदाधिकारी दाखवुन काही दारू दुकानांना स्थानांतरणासाठी हिरवी झेंडी दाखविली असल्याचे वृत्त होते. त्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांचे बिंग फुटल्यानंतर मात्र त्या पदाधिकाऱ्याला मुंग गिळून गप्प रहावे लागले होते. जिल्ह्यातील एका तालुक्यात या पदाधिकाऱ्याचे दारू दुकानांचे अनेक मॉल असल्याचे कळते. त्यातील एका दारु दुकानाच्या विरोधात मोठे आंदोलन झाल्यानंतर हे दुकान रद्द करण्यात आले होते. दारु दुकानांना चंद्रपूर जिल्ह्यात स्थानांतरणाची लागलेली 'होड' बघता लिकर लॉबीमध्ये या कामासाठी कोण सक्रिय आहे ? याचा ही तपास वरिष्ठ यंत्रणेकडून व्हायला हवा अशी मागणी ही आता जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या