वर्षानुवर्षे स्त्री ही पुरुषांच्या हाताखालील बाहूली बनली आहे. एक पुरुष स्त्रीला आपल्या तालावर खेळवत असतो.तीला मारहाण करू शकतो,तीच्या ह्रदयाशी आणि तीच्या मनाशी सुध्दा खेळू शकतो.तीचे मनोधैर्य तो क्षणातच तोडू शकतो.व्यसनाधीन पुरुष तर,तीच्या भावनांचा बाजारच माडंत असतो.कधी काळी असे पुरुष जीवानिशी मारायला सुध्दा धजावत नसतात. स्त्रीच्या जीवनाशी हे अघोरी कृत्य करण्याचा अधिकार पुरूषांना मिळालेला असतो.या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्त्रीने आज आपला नविन इतिहास घडविला आहे.
वाचा :* 👉👉
स्त्रीविषयक अनेक कायदे लागू झालेले आहेत. स्त्रियांना मिळणारे हक्क, त्यांच्या सवलती यांची अधिकाधिक माहिती महिलांपर्यत पोहचली पाहिजे, महिलांकडे वाईट नजरेने बघण्याचा पुरूषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ज्या महिलांच्या अंगी काही ना काही कला गुण असतात,अशा महिलांची योग्य दखल घेऊन,अशा महिलांना योग्य ठिकाणी संधी प्राप्त करून दिली पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल. महिला दिन हा आठ मार्च उत्सव दिन म्हणून नाही तर वर्षानुवर्षे प्रत्येक दिवशी मानला गेला पाहिजे. तो दिवस उत्सव स्वरूपात नसून महिलांवरील अन्याय, अत्याचार यावर मात करणारा असायला पाहिजे.
आज महिला कोणत्याही बाबतीत पुरूषांपेक्षा कमी नाही किंवा घराच्या चार भींतीआड लपून बसणारी नाही, बंदिस्त नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीने उतुंग अशी उंच गगन भरारी घेतली आहे.महिलांनी आज सिध्द केलं आहे की,त्या पुरूषांच्या बरोबरीने नाही तर,त्यांच्या पेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ आहेत. तरीपण,'भय इथले संपत नाही'अशी नेहमीच तीची परिस्थिती झाली आहे.नातेवाईक,ऑफिस, घर,गावातील गुंड प्रवृत्तीची लोकं तीच्या वाटेवरचे काटे बनून तीला कधीही रक्तबंबाळ करण्याचा काही पुरूषांचा प्रयत्न सुरूच असतो.तीच्या आयुष्याचा मुख्य स्वप्न सोहळा म्हणजे तीचं लग्न. तीथेही तीला सासरच्या मंडळीच्या जाचाला बळी पडावे लागते.तीच्या स्वप्ननांची राख रांगोळी केली जाते.प्रत्येक घरामध्ये सासू नावाची स्त्री सुन नावाच्या स्त्रीचा इतका दुस्वास का करते हे अजूनही मानव जातील पडलेल कोडं आहे.तीच्या वाट्याला आलेलं अर्ध आयुष्य तर काडवंळलेलंच असते.त्या काळवंडलेल्या आयुष्याला दुर करण्यासाठी तीची सतत धावपळ सुरू असते.
अनेक क्षेत्रात समशेर बनून स्त्री शत्रुशी झुंज देत असते.हे शत्रू किती आहेत आणि कोण आहेत याच मोजमाप करने कठीण असते.निसर्गाने तीला प्रेम नावाची सुंदर अशी देणगी दिली आहे. ते तीचे एक प्रकारचे शस्त्रच आहे. त्याच शस्त्राने ती अनेक अवघड सत्यकर्म सहज रित्या पार पाडत असते.तीच्या शस्त्रात मंत्राचे सामर्थ्य लपलेले असते.त्याच मंत्राने ती आग लावू शकते आणि त्याच मंत्राने ती आग विझवू शकते.या मंत्राचा तीने कशा पद्धतीने उपयोग करावा हे घरातील लोकांवर आणि समाजातील लोकांवर अवलंबून असते.कारण स्त्री हीच जीवनाची खरी कलाकार आहे. प्रत्येक अभिनय ती सुंदर पध्दतीने पार पाडते.पुरुष हा फक्त तीच्या हातातील कोरा कागद आणि रंग आहे. हे जग प्रत्येक क्षणात बदलत असते.आणि स्त्री सुध्दा आपल्या सध्याच्या परिस्थिती नुसार बदलत असते.म्हणून तीने चंडीकेच रूप धारण करण्याआधी प्रत्येक पुरूषांने स्त्रीचा आदर करने आज काळाची गरज समजायला पाहिजे.
झाडीबोली च्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील कवयित्री संगीता बोरकर-बांबोळे यांचा महिला दिनानिमित्त लेख.... !
1 टिप्पण्या
अतिशय सुंदर लेखन
उत्तर द्याहटवा