सुधीरभाऊ, पण हे सारं येतं कुठून ... ! Sudhir Bhau, but where does all this come from... !


भाऊनं म्हणलं भेटतुनं, तं भेटतुलनचं, कणत्या बी वेळेला भेटणं
पण आजचा येळ दिलं तवा आजचं भेटलं !

“भाऊनं म्हणलं भेटतुनं, तं भेटतुलनचं, कणत्या बी वेळेला भेटणं पण आजचा येळ दिलं तवा आजचं भेटणं !” अशी काहीसी 'वार्ता' दोन इसमांमध्ये कस्तुरबा रोडवरील नाम. मुनगंटीवार यांच्या कार्यालयासमोर 'चालु' होती. बऱ्याचश्या लोकांची त्याठिकाणी गर्दी होती. मुनगंटीवार यांच्या कार्यालयासमोर गर्दी राहणे हे नेहमीचेचं, भेटणाऱ्यांची, कामे घेऊन येणाऱ्यांची गर्दी हे नित्याचेच असते. असेचं काहीसे चित्र कार्यालयासमोर होता. त्यांना भेटायला आलेल्या एक ग्रामीण तर दुसरा थोडासा सुशिक्षीत वाटणारा यांच्यामध्ये शनिवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच-सव्वा पाच वाजता सुरू असलेली 'चालु-वार्ता' जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधुन घेत होती. ग्रामीण भागातील आलेला सुशिक्षीत असलेल्याला आपल्याला भाऊने ५ वाजताची वेळ दिली आहे. ग्रामीण वलनी बोर्डा जवळील एका गावामधील गावकऱ्यांच्या जबरान ज्योत संबंधातील समस्या घेऊन आला होता. तर दुसरा काही अन्य कामांनी भाऊंनी भेटायला आला असेल. त्याला भाऊंनी ४ वाजताची वेळ दिली होती. दोघांमधील या संवादामध्ये सुशिक्षीत वाटणारा ग्रामीण भागातील त्या इसमाला भाऊंचे यावेळी भेटण्याची काही शक्यता नाही, असे समजावित होता. दुपारी १ वाजता मुल तालुक्यातील जुनासुर्ला ४ वाजेपासुन ७ पर्यंत दुर्गापूर त्यानंतर ८ च्या नंतर पुन्हा मुल येथे जाणार असा कार्यक्रम असल्याचे पटवुन सांगत होता. तर ग्रामीण भागातील कार्यकर्ता “भाऊनं म्हणलं भेटतुनं, तं भेटतुलनचं, कणत्या बी वेळेला भेटण पण आजचा येळ दिलं तवा आजचं भेटलं !” असा झाडीबोलीत ठासुन सांगत होता. अखेर वैतागुन सुशिक्षीत वाटणाऱ्या त्या तरूणाने ‘भाऊंच्या कार्यालयातील एखाद्याला विचारा की, भाऊ, मुल येथून दुर्गापूरला गेले कां?' असा शहाणा सल्ला दिला. तर समोरच्याने 'त्याईले कां माहित नाही रायणार. येळ दिली नं आमी थांबतोच. भाऊ भेटणं म्हणजे भेटणं' असे म्हणत विषय बंद केला आणि बाहेरच्या ओट्यावर थांबून वाट पहात राहिला. सुधीरभाऊ भेटतीलचं असा त्याचा दृढ विश्वास भाऊंच्या काम करण्याच्या शैलीची जेवढी प्रशंसा केली जावे तेवढे कमी आहे. भाऊंचे नियोजन वाखाखण्याजोगे आहे. त्यांच्या काम करण्याच्या शैलीची खाजगीमध्ये त्यांचे विरोधक ही प्रशंसा करीत असतात. सुधीरभाऊंचा रोजचा कार्यक्रम काय आहे, याबद्दल रोज सोशल मिडीयाच्या माध्यमातुन त्यांच्या कार्यालयातुन दौरा कार्यक्रम प्रसिद्ध होत असतो. तो कार्यक्रम बघितला नंतर एवढी उर्जा या माणसाला मिळते कुठून हा प्रश्न साहजिकचं मनामध्ये निर्माण होतो. तसेच वरील प्रसंगामधुन दिसत होते. गावकऱ्यांच्या समस्या घेऊन येणाऱ्या ग्रामीण भागातील त्या अर्ध्या वयाच्या ग्रामीण इसमाने सुधीरभाऊंची बहुतेक वेळ घेतली असेल आणि त्याला भाऊंनी पाच वाजताची वेळ दिली असेल तर सुशिक्षीत वाटणाऱ्या त्या युवकाने ही भाऊंची वेळ घेतली असेल त्याला ४ ची वेळ मिळाली असेल वाट पाहुन थकलेल्या त्या सुशिक्षीत वाटणाऱ्याने आपला वैताग ग्रामीणावर काढणारा तो संवाद बरेच काही सांगुन जाणारा होता. अखेर रात्रो पावणे आठ च्या सुमारास सुधीरभाऊंशी त्यांची भेट झाल्याचे कळले. ग्रामीण बांधवाचा 'भाऊं’वरील विश्वास हीच जनप्रतिनिधीची खरी शक्ती आहे. त्यादिवशी नाम. मुनगंटीवार यांच्या दौऱ्यात बघितले असता १ वाजता मुल तालुक्यातील जुनासुर्ला त्यानंतर ४ नंतर दुर्गापूर व रात्रो ८ नंतर पुन्हा मुल असा कार्यक्रम होता. एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये वेळ दिलेल्यांना भेटायचे आहे असे जर भाऊंच्या लक्षात राहत असेल तर हा त्यांच्यामधील दैवीगुण त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा होण्याचे खरे कारण आहे.

हे सुद्धा वाचा : 👉👉 असा सन्मान हे सुधीरभाऊचे भाग्य !

हे सुद्धा वाचा : 👉👉  सुधीरभाऊंसारखा मंत्री पुन्हा होणे नाही !

सुधीरभाऊ, पण हे सारं येतं कुठून ... !

शनिवार १ एप्रिल उमरखेड येथे विविध विकास कामांचे लोकार्पण, ४ वाजता नांदेड येथे चला जाणू या नदी - नदी संवाद यात्रा शुभारंभ, २ एप्रिल २ वाजता दै. लोकमतच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे उपस्थिती, संध्या ५ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती, ३ एप्रिल ला सांगली जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यक्रमास उपस्थिती त्यानंतर विपस यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक त्यानंतर खारघर येथे गायत्री परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. ५ एप्रिल सकाळी ११ वाजता मुंबई येथे मंत्रीमंडळाची बैठक, दुपारी १ वाजता सागरी किनारपट्टीवरील मत्स्य विभागाच्या समस्याबाबत बैठक, त्यांनतर संजय गांधी उद्यानातील येऊर, ठाणे येथील विविध समस्याबाबत मंत्रालयात बैठक सायं. ५ च्या नंतर लोकमतच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती सायं. ६ च्या नंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील साठवण तलावाबाबत बैठक, ६ एप्रिल भाजपाच्या स्थापना दिनानिमीत्त चंद्रपूरातील गांधी चौक येथील कार्यक्रमानिमीत्त उपस्थिती दिवसभर विविध कार्यक्रमात उपस्थिती. ७ एप्रिल चंद्रपूर, मुल, पांढरकवडा (यवतमाळ) पुन्हा चंद्रपूर विविध कार्यक्रमाला उपस्थिती, शनिवार ८ ला मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथील पतसंस्थेच्या कार्यक्रम, त्यानंतर चंद्रपूरातील दुर्गापूर येथे सायं. वेगवेगळ्या कार्यक्रमात उपस्थिती, सायं. ८ वाजता मुल येथील कुश्ती क्रिडा स्पधेच्या कार्यक्रमाला उपस्थिती आणि चंद्रपूर येथे मुक्काम अशा दिवसभराच्या व्यस्त व अति महत्वाच्या कार्यक्रमानंतर ही वेगवेगळ्या समस्या घेऊन येणाऱ्यांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे, येणाऱ्यांचे शांतचित्ताने समाधान करणे हे सारे 'येते कुठून भाऊ?' ही तर दैवी शक्तीचं आहे. ! ती मिळते कुठून याचा मार्ग टिकाकार, कार्यकर्तेव पदाधिकारी यांना अवश्य सांगावा. सुधीरभाऊंचा जनता दरबार, समस्या सोडविण्याची त्यांची शैली, येणाऱ्यांना न वैतागता भेटण्याची त्यांची तऱ्हा, त्यांची अभ्यासु वृत्ती या साऱ्याच गोष्टी करण्यासाठी त्यांना  मिळणारी ऊर्जा हि सामान्य बाब नाही. व ती राजकारण्यासोबत विविध क्षेत्रातील विद्वानांनी अंगीकारण्यासारख्या आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या