राजपुत भामटा मधील भामटा शब्द वगळण्यात येऊ नये मागणी ! demand that the word Bhamta should not be excluded from Rajput Bhamta!


न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलनकरण्याचा बंजारा समाजाचा इशारा !

मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले निवेदन !

चंद्रपूर(का. प्र. ) : वि.जा.अ. प्रवर्गातील राजपुत भामटा मधील भामटा शब्द वगळण्यात येऊ नये., रक्तनात्यातील 2017 चे परिपत्रक रद्द करण्यात यावे व बोगस व्हॅलिडिटी घेणाऱ्यावर व देणाऱ्यावर FIR दाखल करून दोषींवर कारवाई करन्यात यावी या मागणीसाठी नुकतेच बंजारा समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना जिल्हा धिकाऱ्यांमार्फत दिले निवेदन आले. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास  वि.जा.अ.  प्रवर्गातील पूर्ण 14 जाती-जमाती मिळून तिव्र आंदोलन करू तसेच  भविष्यात यामुळे होणाऱ्या परिणामाला महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असा इशारा बंजारा समाजाच्या वतीने १७ मे रोजी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. 


सविस्तर वृत्त असे कि, वि. जा.-अ प्रवर्गात एकुण 14 जाति, जमाती पैकी राजपुत भामटा ही जात त्यात समाविष्ट आहे. राजपुत भामटा जात ही राजपुत समाजापासून पुर्णत्त: वेगळी आहे. राजपुत समाज हा उन्नत व उच्च श्रेणी गटात मोडतो आणि त्यांचे  राजपुत भामटा या जातीशी दुरान्वयानेही कुठेच संबध येत नाही. परंतु तात्कालिन मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी या लोकांचे लांगुलचालन करण्यासाठी 2017 मध्ये रक्त नात्यातील अधीसुचना काढून या सवर्ण लोकांना एका प्रकारे (बोगस लोकांना) वि. जा.-अ प्रवर्गातील मूळ लोकांना डावलून (बोगस लोकांना) बोगस जातवैधत्ता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी, वि. जा.-अ प्रवर्गातील मूळ लोकांना या सवलती पासून वंचित ठेवून त्यांना 2017 पासून बोगस जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आज पर्यंत हजारो राजपूत लोकांनी बोगस जात प्रमाणपत्र मिळवून वि.जा.-अ प्रवर्गातील कित्येक विद्यार्थ्यांचे वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच विविध विषयांच्या पदवी अभ्यासक्रमात घुसखोरी करून पळवून नेले आहेत, हजारो  वि.जा.-अ या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांच्या नोकर्या पळवून, समाजाला आरक्षण असूनही, त्यापासून वंचित ठेवले आहे.

        दिनांक 14 मे 2023 रोजी औरंगाबाद येथे झालेल्या राजपूत महासंमेलनात मा. मुख्यमंत्री /उपमुख्यमंत्री यांनी जे विजा-अ प्रवर्गातील समाविष्ट असलेले राजपुत भामटा मधून भामटा शब्द काढण्यात येईल किंवा काढून टाकू असे घोषित केले आहे, त्यामूळे मुळ वि.जा.-अ  प्रवर्गातील राजपूत भामटा मधून भामटा हा शब्द काढल्यावर सवर्ण राजपूत   समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने आज जसे भ्रष्ट अधिकार्यांना हाताशी धरून जसे बोगस जाती प्रमाणपत्र काढत आहेत. त्याचे प्रमाण लाखोंवर जाऊन, हा सवर्ण समाज दर्योखोर्यात, पालीत, तांड्यात हलाखीचे जिवन जगणर्यावर वि.जा.- अ प्रवर्गातील 14 जातींवर फार मोठा घाला ठरणार आहे. ही घोषणा वि.जा.-अ प्रवर्गातील जातींवर जिवघेणा घातक हल्ला असून वि.जा.-अ प्रवर्गातील 14 जातींना संविधानिक अधिकारापासून वंचित करण्याचे षडयंत्र शासन स्तरावर रचला जात आहे. वि.जा.-अ प्रवर्गातील राजपुत भामटा मधील भामटा शब्द वगळ्याने संपूर्ण राजपुत समाज हा  विमुक्त जातीचे आरक्षणाचे हकदार बनविण्याचा कट-कारस्थान असून या बाबींवर संपूर्ण बंजारा समाजाचे अतितीव्र आक्षेप  आहे.  तरी राजपूत भामटा मधील भामटा शब्द वगळण्यात/हटविण्यात येऊ नये, तसेच बोगस व्हॅलिडिटी घेनाऱ्यावर व देणाऱ्यावर एफ. आय. आर.  दाखल करावा कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित असल्याची मागण17 मे 2023 रोजी चंद्रपूर जिल्हा समस्त बंजारा बांधवानी निवेदनातून केली आहे. यावेळी  रामराव चव्हाण, विश्वनाथ  राठोड, प्रकाश राठोड, अशोक राठोड इ. ची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या