माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार यांच्या मागणीला यश !
गोंडपिपरी (प्रति.)
वर्धा, वैनगंगा नदी तीरावर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तोहोगांव परिसरातील अनेक गावांचा पावसाळ्याच्या दिवसात पूर्णतः संपर्क तुटतो. पूर ओसरेपर्यंत गावाला बेटाचे स्वरूप येते. मागील वर्षी या पुरामुळे तोहोगांवातील एका बालकाला उपचार मिळाला नाही. प्रशासनाने बोटीच्या मदतीने त्याला चंद्रपुरात दाखल केले पण उपचारासाठी उशिर झाल्यामुळे बालकाचा मृत्यु झाला. या घटनेनंतर परिसरात हा मुद्दा संवेदनशील ठरला. पूरपरिस्थितीत नागरिकांची होणारी समस्या लक्षात घेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर बोडलावार Amar bodlawar यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे हा मुद्दा मांडला. या मागणीची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार mungantiwar यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी आराखड्यात कन्हाळगांव - तोहोगांव मार्गावर मोठ्या पुलासाठी दहा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या पुलाला मंजुरी मिळाल्याने तोहोगांव परिसरातील अनेक गावांतील नारिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द केला पुर्ण !
कन्हाळगांव-तोहोगांव पुलाच्या मागणीला पालकमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासुन वाचविले आहे. सदर पुल मंजुर करावा यासाठी मी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे मागणी केली होती, या मागणीला गांभीर्याने घेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजुर करून दिला. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पुर्ण केला. पालकमंत्र्यांचे प्रयत्नामुळे तोहोगांव-कन्हाळगांव पुलासाठी दहा कोटी रूपयांचा निधी मिळाला, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, आपण पालकमंत्र्यांचे आभारी आहे, असे मत माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार Amar bodlawar यांनी व्यक्त केले.
वाघाची शिकार करणाऱ्या कुख्यात टोळीला पकडण्यात वनविभागाचे संयुक्त पथक यशस्वी !
✒️ *"विदर्भ आठवडी" ने जुळ्या जिल्ह्यातील तस्करांचे जाळे यावर टाकला होता प्रकाश!*
0 टिप्पण्या