समाजाभिमुख राजकारणातील उसैन बोल्ट !
सन १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्याबद्दल व्यक्तिगत आत्मीय सहानुभूती असुनसुद्धा तयांच्या विरोधात वेगळ्या विचारधारेमुळे निवडणुक लढविणारे गोरगरीबांचे डॉक्टर डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार आणि स्व. चांगुणाताई या आदर्श माता-पित्यांच्या पोटी सुधीरभाऊंचा जन्म ३० जुलै १९६२ ला झाला. त्याचवर्षी चीनने भारतावर आक्रमण केले होते म्हणुनच की काय सुधीरभाऊ शालेय-महाविद्यालयीन जीवनापासुन जनप्रश्न सोडविण्यासाठी आक्रमक आहे. महराठी, हिंदी, इंग्रजी या भाषातील वक्तृत्व आणि लिखाणावर त्यांची फार पकड असली, ते ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासारखे अभ्यासू असले, विदेशवारीचा उद्देश केवळ पर्यटन हा न् ठेवता त्या-त्या देशतील काय काय आपल्या चांदा जिल्ह्यात, विदर्भात, महाराष्ट्रात आणता येईल हाच त्यांचा उदद्देश असतो. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असा शांत वाहते गंगामाई स्वभाव असला तरी अन्याय, भ्रष्टाचार विरोधात हा क्रुसेडर एखाद्या सात्विक संतापापायी जेंव्हा आक्रमक होतो तेंव्हा तो कुणाला जनदाग्नी वाटु शकाते, या बुवास खोटे बोलणे, थापा मारणे, कुणाची निंदा करणे मुळीच जमत नाही म्हणुन ते समोरच्यांकडून तशीच अपेक्षा करतात हे त्यांचे चुकले कोठे ? सत्तापक्षात असो कि विरोधी पक्षात असो विधीमंडळात कोण काय आणि केंव्हा काय बोलले याचा मिनीट, सेकंदाचा तपशिल या मानवी परम संगणकाकडे सदैव अपटुडेट असतो. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक इत्यादींचा जनप्रश्न तातडीने सोडविण्यासाठी 'हॅलो चंद्रपूर' योजना प्रचंड जनप्रतिसाद मिळवीत आहे. चंद्रपूर सुपूत्र कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे मूल येथील बहुउपयोगी स्मारक असो कि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचे स्मारक सांगली या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्याचे स्वप्न त्यांनी विरोधी पक्ष आमदार म्हणुन काँग्रेस-राकाँ आघाडी च्या सत्ताकाळात पाहिले आणि त्याची पूर्तता करणे शक्य झाले याचे कारण एकच कि वैचारिक मतभेद अवश्य असावे पण मनभेद मुळीच असु नये ही त्यांची आदर्श आचारविचार शैली आणि तोडीला चिकाटी, जिद्द ची साथ !
डॉक्टर न् होता समाजाभिमुख राजकारणी हा पर्याय त्यांनी निवडल्यामुळे आणि तो महाराष्ट्रासाठी आश्वासक आणि सुखावह असला तरी महाराष्ट्राने एक संभावित पत्रकार गमावलेलाआहे. भुमिपूत्र आणि व्यवसायाने शेतकरी असलेल्या सुधीरचे वडील डॉ. सच्चिदानंद, पत्नी वपना, मुलगी शलाकार असे आटोपशीर कुटूंब आहे. त्यांचे बंधू डॉक्टर आहेत. भगीनी सुस्थितीत आहे हे त्यांचे लौकीक अर्थाने कुटूंब असले तरी या बुवाने प्रत्यक्षात सर्वच समाजाला आपले कुटूंब मानून या विशाल कुटुंबाच्या भल्याची जबाबदारी समर्पित भावनेने समर्थपणे सांभाळली आहे.
हरित महाराष्ट्रासाठी वृक्ष लागवड महाअभियान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन आणि जतन, गोंडवाना विद्यापीठ स्थापना, अत्याधुनिक इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, जनप्रश्न सोडवणुक आणि जन मार्गदर्शनन यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची स्थापना आणि तेथे साहित्य, रंगभुमी, संस्कृती साठी व्यासपिठ, जनता आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक केंद्र बनविणे, अंधारी-ताडोबा व्याघ्र प्रकल्पास जागतिक स्तराचे पर्यटन केंद्र बनविणे, आपल्या मंत्रालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळवून देतांना त्यांचे मंत्रालय त्याबाबतीत, मानांकन मिळविणारे भारतातील पहिले मंत्रालय ठरले. 'गांधी फॉर टुमारो' उद्यानासाठी गांधी या प्रकल्पांनी काँग्रेस-राकाँ च्या आघाडी सरकारात कागदोपत्रीचं अस्तित्व होते पण सुधीरभाऊंनी ही योजना -हा प्रकल्प जवळजवळ पुर्णत्वास आणुन वर्धा जिल्ह्यातील जनतेचे आणखी प्रेम प्राप्त केले आहे. गांधीजी-विनोबाजी यांच्या परीस्पर्शाने, कार्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यातील परिसराचा खराखुरा विकास म्हणजेचे गांधी फॉर टुमारो !
भारतरत्न पं. अअलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग, लालकृष्णजी अडवानी, स्व. प्रमोद महाजन, नितीनभाऊ गडकरी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली. मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस इत्यादी मान्यवरांना कर्तबगार सुधीर फार फार भावला आहे. त्यांची सामाजिक बांधीलकी ध्यानात घेता उद्योगपतींचे अग्रणी त्यांची चंद्रपूर येथे भेट घेवून सामाजिक प्रकल्प त्यांचे सहकार्याने राबविण्याचा सार्थक प्रस्ताव ठेवतात. योगगुरू आचार्य रामदेवबाबा आपले प्रकल्प विस्तारित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि चांदा जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्यांच्यापुढे सहकार्याचा हात पुऐ करतात ही फार मोठी उपलब्धी आहे. विदेशी व्हीआयपी राजशिष्टाचार बाजुला सारून विविध विषय - प्रकल्पावर त्यांच्याशी स्वतःहुन चर्चा करता ही बाब महत्वाची आहे.
वर्धा जिल्ह्यातील लहान मोठे जनप्रतिनिधी, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला तर पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक इत्यादींचा समावेश असलेली 'वर्धा हेल्पलाईन' जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्थापित करू शकतात. चांदा हेल्पलाईन ला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रकारची भारतातील प्रथम हेल्पलाईन 'हॅलो चांदा' आहे.
सुधीरभाऊ, पण हे सारं येतं कुठून ... !
सुधीरभाऊंना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
*Happy Birthday to Sudhirbhau!*
भविष्यातील राजकारणाचे प्रतिबिंब दर्शविणारा जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' हा मराठी चित्रपट सन १९७९ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पत्रकाराची भुमिका बजाविणारा 'दिघू' शेवटच्या क्षणीची आत्महत्या करतो, चित्रपटातील तो क्षण प्रेक्षकांना चटका लावुन जाणारी व अबरेच काही सांगून जाणारी होती. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या अनपेक्षित उलथापालथीनंतर या चित्रपटाची चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुज्ञ करू लागले. महाराष्ट्रातील राजकारणाच्या उलथापालथीचे पेव जिल्हा-ग्रामपातळीवर दिसू लागले आहे. पक्षासाठी - नेत्यांसाठी स्वतःला वाहून घेणारे कार्यकर्ते - पदाधिकारी अपवाद वगळता संपल्यागत जमा झाल्याचे चित्र दिसत आहे. स्वतःच्या भरवशावर निवडुन येण्याची लायकी नसणारे ही आम्हीचं कसे ज्येष्ठ-श्रेष्ठ हे दाखविण्यातचं मग्न असल्याचे वातावरण दिसत आहे. स्व-कर्तबगारी, अभ्यास, जनसंपर्क, जनसामान्यांच्या समस्या पोटतिडकीने सोडविणाऱ्यांना यशाचे शिखर गाठण्यापासुन कुणीही थांबवू शकत नाही. याच तत्वावर नेहमी कार्यरत असणारे व्यक्तीमत्व सुधीरभाऊ मुनगंटीवार हे त्यातील एक नेते आहे. अती व्यवस्तेतही सर्वसामान्यांच्या तक्रारी, समस्या, निवेदने त्या त्वरित सोडविण्यासाठी सुधीरभाऊंची तळमळ, यासंबंधात होणारा पाठपुरावा, तसेच आपला-तुपला न पाहता आलेले फोन, एसएमएस, व्हॉटस्ॲप याची भाऊंकडून घेतली जाणारी दखल तसेच रात्रो उशिरापर्यंत जागे राहून संताप, वैताग न करता जनविकासासाठी कार्य करण्याची "भाऊं"ची पद्धत याची विरोधक ही खाजगी मध्ये प्रशंसा करीत असतात. सामान्य कार्यकर्ता ते राज्याचे मंत्री पदापर्यंत चा 'भाऊ' चा प्रवास हा थक्क करणारा असुन राजकारणात यशस्वी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी प्रेरणादायी व राजकीय पातळी उंचावून यशाची शिखर गाठण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्र - भारताच्या राजकारणात आपल्या कर्तुत्वाने आपली अमिट छाप उमटविणारे मुनगंटीवार यांचा आज जन्मदिवस...! आपल्याला लेखणीने आपली छाप उमअविणारे ज्येष्ठ व निर्भिड पत्रकार, माझे पत्रकारितेतील गुरू स्व. सुरेश धोपटे यांनी रविवार दि. ३० जुलै २०१७ रोजी साप्ता. विदर्भ आठवडीमध्ये प्रकाशित लेख 'एकाच वेळी भगीरथ आणि श्रावणबाळ असलेला 'भाऊ' मुनगंटीवार सुधीरभाऊ... !' सुज्ञ वाचकांसाठी...!
-राजु बिट्टूरवार, संपादक, विदर्भ आठवडी
वर्धा येथे जन्मलेले थोर क्रांतिकारी आणि जगप्रसिद्ध कृषीतज्ज्ञ डॉ. पांडूरंगजी खानखोजे यांचे वर्धा येथे स्मारक उभारल्या जावे यासाठी आपण सर्वांनी एक संयुक्त निवेदन पालकमंत्र्याना द्यावे. या मागणीची पुर्तता वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार नक्कीच करतील असे पत्र वर्धा नगर पालिकेचे अध्यक्ष अतुल तराळे (भाजप) यांना स्विकृत भाजप नगरसेवक यांच्या माध्यमातुन (हस्ते) सहा-सात महिन्यांपुर्वी पाठविले होते, त्याचा अजुन ही प्रतिसाद तर सोडाच त्या पत्राची पोच सुद्धा नाही. नितीनभाऊ गडकरी, देवेंद्र फडणविस, सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे फ्लेक्स बोर्ड लावल्याने काहीही साध्य होत नाही. काँग्रेस संस्कृतीतूनच लहानाचे मोठे झालेले आणि दत्ताभाऊ मेघे यांच्यामुळे भाजपात पावन करून घेतलेले वर्धेचे भाजप आमदार ..... चाकोरीबद्ध आमदारकीतच व्यस्त आहेत. त्यांनाही वर्धा सुपूत्र डॉ. पांडूरंग खानखोजेयांच्या नवीन पिढील प्रेरणादायी ठरू शकणाऱ्या स्मारकाशी काहीही देणे-घेणे नाही. आत्तापर्यंत मुनगंटीवार यांच्या सारखा कर्तबगार, जनस्नेही पालकमंत्री वर्धा जिल्ह्यास कधिच मिळाला नाही असे असतांना वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासासाठी, नवनविन योजना वर्धा जिल्ह्यात खेचून आणण्यासाठी, वर्धेकर पुढारी, कार्यकर्ते, नागरिक सुधीरभाऊंचा सदुपयोग करून घेत नाही ही माझी खंत आहे.
नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामांकर करण्यात त्यांना यश आले. एवढेच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वारसांना सन्मानपूर्वक आधार ही त्यांनी मिळवून दिला. निवास कामासाठी पियुष गोयल, लोकमत मिडीया प्रा. लिमीटेडचे चेअरमन व अन्य राज्यसभा खासदार, विधानसभा- विधानपरिषद आमदारांचे ही सहकार्य पक्षीद बाजुला सारून त्यांना मिळाले. कुटूंबिय, नातेवाईक, मित्र मंडळी यांचा राजकारण किंवा प्रशासनात त्यांनी मुळीच हस्तक्षेप करू दिला नाही. त्यांच्याकडे कोणतेही योग्य लहान-मोठे काम घेवून गेलातर त्याचे काम करायचे जरूर पण त्यात मध्यस्थ मुळीच नको ही त्यांची स्पष्ट भुमिका राहिली आहे. त्यांचे दोन तीन कार्यालयीन सहकाऱ्यांचा अपवाद वगळता बाकीचे कार्यालयीन सहकारी सैरभैर झाले आहेत. त्यांचा सामान्यजणांना फार त्रास होतो हे कटूसत्य येथे नोंदवावेसे वाटते. आलेल्या प्रत्येकाची भेट, त्यांचे अर्ज, निवेदन, पत्राची दखल ही जबाबदारी ही ते पार पाडत असतात. त्यांच्या असंख्य विकास कामाचा मी येथे धावता परामर्श मुळीच घेत नाही कारण ते करत बसलो तर माझे आयुष्य त्यासाठी अपुरे पडेल.
सन १९९५ पुर्वी सुधीरभाऊबद्दल लिहीतांना मी नमुद केले होते की ते भविष्यातील महाराष्ट्रातील आश्वासक चेहरा ठरतील पण ते त्यांनी आपल्या कर्तबगारीने खोटे ठरविले आहे. समाजाभिमुख राजकारण आणि विकास याबाबतीत सुधीर आता भारताचा आश्वासक चेहरा बनले आहे म्हणुनच कोणाला पटो वा ना पटो एकाच वेळी 'भगीरथ आणि श्रावणबाळ असलेला भाऊ ! मुनगंटीवार सुधीरभाऊ !!' लिहीतो आहे. भाऊ, जन्मदिनी अनंत शुभेच्छा !!
-सुरेश धोपटे, (साभारः विदर्भ आठवडी, ३० जुलै २०१७)
0 टिप्पण्या