चंद्रपूर (वि. प्रति . )
आज होतील, उद्या होतील, असे म्हणता म्हणता महानगरपालिका, जि. प. व पं. स. च्या निवडणुका (Elections to local bodies) लांबणीवर टाकल्या जात आहेत. प्रशासकांच्या भरवशावर मागील दिड-दोन वर्षापासुन स्थानिक स्वराज्य संस्थांचे कारभार सुरू आहे. त्यामुळे संभावित उमेदवार 'धन' संकटाच्या सावटात सापडल्याचे चित्र बहुतेक ठिकाणी बघायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींची स्थिती तर फार वाईट आहे. मतदारांना सांभाळता-सांभाळता आता नाकी नऊ आल्याचे खुले आम आता संभावित उमेदवार बोलतांना दिसत आहे.
संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections to local bodies) अद्याप घोषित झाल्या नाहीत. आज होईल-उद्या होईल या भरवशावर संभावित उमेदवार आप-आपल्या मतदारांना सांभाळतांना त्यांच्या नाकी नऊ आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या अपेक्षा, विविध कार्यक्रमाचे फ्लैक्स बॅनर, विविध सण तथा महापुरूषांचे जयंत्या- पुण्यतिथ्यांचे कार्यक्रमाचे व विविध स्पर्धांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची लागलेली रिघ व त्यांच्या अपेक्षा या आता संभावित उमेदवारांना डोईजड झाल्या असल्याचे दिसत आहे . त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या उलथा-पालथीमुळे संभावित उमेदवारांना इथून किंवा तिथून कुठून तरी आपला तिकीटाचा मार्ग मोकळा असल्याने ते निश्चिंत झाले आहे. फक्त कार्यकर्त्यांना व मतदारांना सांभाळून ठेवण्याची मागील दिड वर्षापासून सुरू असलेली कसरत यामुळे आता संभाव्य उमेदवार 'धन' संकटाच्या सावटात सापडले आहेत. केंव्हा निवडणुका लागतात आणि केंव्हा आपला मार्ग मोकळा होईल असे संभाव्य उमेदवारांना वाटू लागले आहे. Elections to local bodies across the state are yet to be announced. We get to see the picture of the potential candidates taking care of their voters with the hope that it will happen today and it will happen tomorrow. Expectations of the voters, flags of various programs, various festivals and celebrations of great people's birthdays and martyrdoms, the righ of the activists and their expectations are now being doused by the potential candidates. In addition, due to the upheaval in Maharashtra politics, potential candidates are relieved as their ticket path is clear from here or there. Due to the last one and a half year exercise to maintain only the workers and voters, the potential candidates are now in the shadow of 'money' crisis. Prospective candidates are starting to wonder when the elections are due and when their path will be cleared.
चंद्रपूर chandrapur असो नागपूर असो की मुंबई राज्यातील सरकारने कामांचा धडाका सुरू केला आहे. विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले जात आहे. रस्त्यांच्या, पुलाच्या सुशोभीकरणासह अनेक कामांचे होत असलेले लोकार्पण आणि यामुळे माजी नगरसेवक व संभावित उमेदवारांमध्ये उत्साहाची लाट असुन त्यामुळे लोक समाधानी असल्याचे चित्र दिसत असुन फक्त कार्यकर्ते व मतदारांना सांभाळण्याची संभाव्य उमेदवारांना कसरत करावी लागत आहे. आत्ता निवडणुका लागल्यास आपला, आपल्या पक्षाचा किंवा आपल्या परिवारातील सदस्याचा विजय निश्चित आहे, असा कयास माजी नगरसेवकांकडून लावला जात आहे. सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी जेवढ्या लवकर निवडणुका लागतील तेवढ्या लवकर 'धन' संकटाच्या सावटातून बाहेर निघता येईल, अशी आशा संभावित उमेदवार बाळगून आहेत.
0 टिप्पण्या