गांधीजी...! gandhiji...!



शांतीचा संदेश ।
अहिंसेचे शस्त्र ।
खूप मोठे अस्त्र ।
देशासाठी ।।

मनात संकल्प ।
निर्णय तो ठाम ।
जपला जो नाम ।
स्वातंत्र्याचा ।।

शिकवली तुम्ही।
राष्ट्रभक्ती खरी ।
मिटवली दूरी । 
भेदभाव ।। 

मनी  जागवली   । 
स्वातंत्र्याची वात । 
काळोखाची रात । 
मिटविली  ।।

तुम्हांमुळे आम्हां । 
लाभले स्वातंत्र्य । 
नष्ट पारतंत्र्य   । 
भारताचे ।।

साधीच राहणी। 
जपतोय मनी  । 
विचार सरणी  । 
उच्च ठेवू  ।। 

सुवर्ण अक्षरी । 
स्वातंत्र्याची गाथा । 
उंचावतो माथा । 
तुम्हांमुळे ।। 

-दिनेशकुमार अंबादे
संपर्क :   ८२७५१४६६१८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या