परप्रांतीय बांधवांनी व्यक्त केली 'सुधीरभाऊं'बद्दल कृतज्ञता !
चंद्रपूर (वि. प्रति . )
एखाद्या राजकीय पुढाऱ्यांचे फक्त नांव सांगुन काम होत असेल त्यात पुढाऱ्याची प्रतिमा किती मोठी आहे याचा अंदाज लागतो. आज अनेक जण राजकीय पुढाऱ्यांसोबत फोटो सेशन करून आपला स्वार्थ साधतात, परंतु एखाद्या गरजु, आजार-आर्थिक संकटांत सापडलेल्या लाचार व्यक्तीला जर नेत्याचे नांव सांगुन मदत मिळत असेल तर ही बाबचं त्या नेत्याची उंची सांगुन जाणारी बाब आहे.
महाराष्ट्राचे अभ्यासु मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या बाबतीत ही अशीच घटना घडली.
उत्तरप्रदेशातील गाजीपुर येथील मोनु रामबचन यादव हा २३ वर्षीय युवक महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील अमाप प्रेस अॅन्ड टुल प्रा. लिमी. या एमआयडीसी स्थित कंपनीत कामाला होता. १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी तो आपले नियमित काम करीत असतांना त्याचे दोन्ही हाताचे ७ बोटे तो काम करीत असलेल्या मशिनवर कापले गेले. कंपनीने मोनु ला संभाजीनगर येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याचे सात ही बोटे पुर्णपणे कटल्यामुळे तो कंपनीमध्ये कार्य करू शकत नव्हता. उत्तरप्रदेशातील त्या युवकाच्या रोजगारावरचं त्याचे उत्तरप्रदेशात राहणारे आई - वडील व कुटूंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळे मोनु मोठ्या विवंचनेत सापडला. त्यांनी ज्या कंपनीत कार्यरत होता तेथील वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली परंतु कंपनी व्यवस्थापनाने या बाबीला गांभीर्याने घेतले नाही व त्या युवकाला आपल्या गावी परत जाण्यास व बरे झाल्यावर परत कामावर घेण्याचे वचन देऊन स्वगावी पाठविले, त्यामुळे त्रस्त झालेल्या मोनु यादव यांनी चंद्रपूरातील त्यांचे परिचित भाजयुमोचे पदाधिकारी राजेश यादव व भाजप कार्यकर्त्यांना घडलेली दुर्घटना व झालेल्या प्रकाराची माहिती दिली. भाजयुमो चे चंद्रपूर शहर सचिव राजेश यादव यांनी सदर बाब भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांना सांगीतली. पावडे यांनी कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा सल्ला राजेश यादव यांना दिला. राजेश यादव यांनी संभाजीनगर येथील कंपनी संचालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून स्वतःचा परिचय देत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे नांव सांगुन आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असुन मोनू यादव यांना आर्थिक मदत करण्याची विनंती केली. कंपनीच्या संचालकांनी त्वरित मोनू यादव याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेवून मुनगंटीवार यांच्या नावांच्या प्रभावाला प्रतिसाद देवून मोनू यादव याला १२ लाख रूपयांची त्वरित मदत उपलब्ध करून दिली. फक्त मुनगंटीवार यांचे नांव सांगुन आलेल्या संकटातुन सावरण्यासाठी मिळालेल्या मदतीमुळे मोनु यादव यांचे वडील रामबचन यादव, आई, गाजीपुर चे मुखिया राहुल यादव, गावातील नागरिकांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानुन असा लोकप्रतिनिधी अद्याप आम्ही बघितला नाही या शब्दात त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. परप्रांतीय बांधवांमध्ये ही प्रसंगामुळे मुनगंटीवार यांचे आभार मानुन प्रशंसा व्यक्त केली जात आहे.
Link वर click करा व हे सुद्धा अवश्य वाचा....
आपल्या अभ्यासु वृत्तीमुळे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख तर निर्माण केलीचं परंतु त्यांच्या कार्याची प्रचिती एवढी मोठी आहे की आता महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील परप्रांतीय मजुराला त्यांचे फक्त नांव घेण्याने सहयोग मिळत असेल तर त्यांच्या ख्यातीची, कार्याची प्रशंसा जेवढी करावी तेवढी अपुरी आहे. यापुर्वी हिंगोली जिल्ह्यातील बारा ज्योतिलिंगापैकी आठवे ज्योर्तिंलिंग असलेल्या औंढा या गावात त्यांचे नाव महाविद्यालयाला देण्यात आले, गुरूकुंज मोझरी येथे गुरूदेव भक्तांनी तुकडोजी महाराज ज्या पिठावर बसत असे त्या पिठावर बसवून 'भाऊंचा सत्कार केला होता, या घटना कुणी काहीही म्हणा नक्कीचं स्मरणातून जात नाही.
0 टिप्पण्या