चंद्रपूर (वि. प्रति . )
चंद्रपूर लोकसभा मतदार संघाकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवार २७ मार्च शेवटच्या दिवसापर्यंत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अर्ज भरणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या ३६ तर दाखल नामनिर्देशनपत्रांची एकुण संख्या ४८ झाली आहे. आज २८ मार्च रोजी अर्जाच्या छानणीनंतर १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून वैध उमेदवारी अर्जामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस धानोरकर प्रतिभा सुरेश, भारतीय जनता पार्टी मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद, बहुजन समाज पक्ष राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके, जनसेवा गोंडवाना पार्टी अवचित श्यामराव सयाम, जय विदर्भ पार्टी अशोक राणाजी राठोड, गोंडवाना गणतंत्र पार्टी नामदेव माणिकराव शेडमाके, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी पुर्णिमा दिलीप घोनमोडे, वंचित बहुजन आघाडी बेले राजेश वारलुजी, अखिल भारतीय मानवता पक्ष वनिता जितेंद्र राऊत, सन्मान राजकीय पक्ष विकास उत्तमराव लसंते, भीमसेना विद्यासागर कालिदास कासर्लावार, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) सेवकदास कवडूजी बरके, अपक्ष दिवाकर हरिजी उराडे, अपक्ष मिलींद प्रल्हाद दहिवले, अपक्ष संजय निलकंठ गावंडे हे उमेदवार रिंगणात आहेत. ३० मार्च पर्यंत उमेदवारांना आपले नामांकन अर्ज वापस घेता येणार आहेत, त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
0 टिप्पण्या