चंद्रपूर (निवडणूक विशेष)
भारताच्या स्वातत्र्यानंतर चार वर्षानी पहिल्या लोकसभा निवडणुका झाल्या. लोकसभेची पहिली निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण होती. या निवडणुकीची प्रक्रिया २५ ऑक्टोबर १९५१ ला सुरूझाली आणि २१ फेब्रुवारी १९५२ ला संपली. ही निवडणूक सुमारे चार महिने चालली. हा देशातला सर्वात मोठा मतदान कालावधी ठरला. देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक २५ राज्यांतल्या ४०१ मतदारसंघांतल्या ४८९ जागांसाठी ६८ टप्प्यांत पार पडली.
यंदाच्या (२०२४) लोकसभा निवडणुकीत १९ एप्रिलला पहिला टप्पा पार पडेल आणि त्यानंतर ४७ दिवसांनी मतमोजणी झाल्यावर ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी लागणारा कालावधी हा १९५१-५२ च्या संसदीय निवडणुकांनंतरचा दुसरा सर्वात मोठा मतदान कालावधी असेल. या पहिल्या निवडणुकीत लोकसभेच्या ४८९ जागांसाठी ५० हून अधिक पक्षांचे दीड हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात होते. यातले जवळपास १०० मतदारसंघ हे द्विसदस्यीय होते. म्हणजे, एकाच मतदारसंघातून सर्वसाधरण आणि राखीव असे दोन खासदार निवडून येत. पुढे १९६० च्या दरम्यान ही पद्धत रद्द करून, एका मतदारसंघातून एकच खासदार, म्हणजे जसं आता आहे, तसं करण्यात आलं.
सुकुमार जैन पहिले निवडणुक आयुक्त !
भारतात १९५० मध्ये निवडणुक आयोगाची स्थापना झाली होती. त्यावेळी सुकुमार जैन हे भारताचे पहिले निवडणुक आयुक्त ठरले. त्यायनंतर प्रथमचं मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यामध्ये १७ कोटी ६० लाख मतदारांची नोंदणी झाली होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २१ वर्षे वयाची अट होती. पाच महिने चाललेल्या या निवडणुकीत १ हजार ८७४ उमेदवार रिंगणात होते.
असे झाले होते मतदान !
मतदान केंद्र दुर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल, पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनविण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टिलचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी मतपेया बुलेटप्रुफ होत्या.
आज ही सुरू आहे ती पद्धत !
मतदारांना उमेदवाराची ओळख व्हावी म्हणून नावासमोर चिन्ह दिली गेली होती. चिन्ह देण्याची त्यावेळची पद्धत आजही कायम आहे. पहिल्या निवडणुकीत सुमारे २८ लाख महिला मतदारांचा समावेश होता.
मतदार याद्यांमध्ये अशी होती महिला मतदारांची नांवे !
पहिल्या निवडणुकीत महिला मतदार याद्यांमध्ये महिलांची नांवे ही फार हास्यास्पद होती. 'अमक्याची बायको', 'तमक्याची सुन', ‘अमक्याची बहिण’, ‘तमक्याची सासु' अशी महिला मतदारांची नांवे मतदार यादीमध्ये होती. निवडणुक आयोगाने नंतर ती नांवे वगळली. घरच्या मोठ्या मंडळींनी किंवा पतींनी महिलांना आपली नांवे सांगण्यास किंवा देण्यास नकार दिल्यामुळे अशी नोंद करण्यात आली होती.
केरळ मध्ये सर्वाधिक ८० टक्के तर मध्यप्रदेशात २० टक्के !
पहिल्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान केरळच्या कोट्टायम मतदार संघात झाले होते. तिथे ८० टक्के मतदान झाले तर मध्यप्रदेशच्या शहडोल मतदार संघात फक्त २० टक्के इतके कमी मतदान झाले.
(स्त्रोत : इंटरनेट)
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात भाराकाँ ने निवडणुक लढविली !
बाल्यावस्थेत असलेल्या भारतीय लोकशाहीच्या या पहिल्या निवडणुकीत अर्थातचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता आणि ही निवडणुक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात लढविली गेली. ज्यावेळी निवडणुक झाली त्यावेळी कोणतेही मोठे आव्हान काँग्रेस किंवा नेहरूजींसमोर नव्हते.
पंतप्रधान पदावर संधी देण्यासाठी नेहरूजींनी साम्यवादाविरोधात आवाज उठविला होता. साम्यवाद हा देशाला रसातळाला नेणारा विचार असल्याची ठाम भूमिका यावेळी नेहरूजींकडून मांडण्यात येत होती. पहिली निवडणुक त्यात ही भारतीय लोकशाही बाल्यावस्थेत असतांना भारतीय लोकशाहीच्या या पहिल्या उत्सवात सोशालिस्ट पार्टी, भारतीय जनसंघ आणि हिंदू महासभा, किसान मजदूर प्रजा पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन असे वेगवेगळे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ३६४, अपक्ष ३७, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया १६, सोशालिस्ट पार्टी १२, किसान मजदूर पार्टी ९, पिपल्स डेमोक्रेटीक फ्रंट ७, गणतंत्र परिषद ६ व हिंदु महासभा ४ अश्या जागा मिळाल्या होत्या. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया १६ जागा घेवून दुसऱ्या स्थानी राहिला. त्यावेळी भारतात श्रीपाद अमृत डांगेसह डाव्या विचारांचे अनेक नेते होते.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात होते तिन उमेदवार !
सन १९५१ मध्ये झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघ - १९ असा संबोधला गेला होता. या मतदार संघात ३,६८,२२५ मतदारांपैकी २ लाख ३० हजार ३३६ मतदान झाले. महत्वाचे म्हणजे कोणतेही अवैध मतदान यावेळी झाले नाही. त्यातील भाराकाँ चे मुल्ला अब्दुलभाई ताहेर अली यांना ६१ टक्के म्हणजे १,४२,२७७, सोशालिस्ट पार्टी चे गोविंदराव निलकंठराव हास्तक यांना २३.९४ म्हणजे ५५,१४८ तर आर. आर. पी. चे रनशाह बापू गंगशाहा बापु सय्यम यांना १४.२९ टक्के ३२,९११ मते मिळाली होती. भारतीय लोकशाही ची २०२४ ची निवडणुक ही १८ वी निवडणुक आहे. या निवडणुकीत एकंदर १८ लाख ३६ हजार ३१४ मतदार आहेत.
----------------------------------------------------
Link वर क्लिक करा.
-------------------------------------------------
१५ उमेदवार रिंगणात, भाजपचे मुनगंटीवार (mungantiwar) व काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (dhanorkar) यांच्यात लढत !
१३-चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकंदर १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असुन दुहेरी लढत याठिकाणी होणार असल्याचे चित्र आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाचे मुद्यावर तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर हे लोकशाही विरूद्ध हुकूमशाही या मुद्याला प्राधान्य देत या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी, आर्णी असे ६ विधानसभा क्षेत्र चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात असुन उमेदवारांच्या प्रचाराला रखरखत्या उन्हात सुरूवात झालेली आहे.
0 टिप्पण्या