चंद्रपूर (का.प्रति)
१९ एप्रिल ला होऊ घातलेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार कार्याला वेग आला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर अशी दुहेरी लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. बैनर, पोस्टर, मोहल्या-मोहल्यात फिरणारे भोंगे यांनी निवडणुकीत चांगलाचं रंग भरला आहे . काॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रचारात कार्यात सुरूवातीपासून आघाडी घेतली असून गावा-गावात, शहरा-शहरात कांग्रेसचे बैनर जागोजागी नजरेत पडत आहेत तर भाजप उमेदवार मुनगंटीवार यांच्या प्रचाराच्या लहान व कमी बैनरची लोकसभा क्षेत्रात चर्चा सुरू आहे. "भाजपचे तर बैनरचं दिसत नाही जी....!" "बैनर तं लहान -लहान आहे जी!" अशा चर्चा होतांना हमखास दिसते आणि ही वस्तुस्थिती आहे. काॉंग्रेसच्या उमेदवारांच्या तुलनेत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे बैनर लहान व कमी संख्येत बघायला मिळत असल्यामुळे या चर्चा होणे स्वाभाविक आहे.
---------------------------------------------------
Also read
-------------------------------------------------------
त्यांचे उत्तर ही नुकतेचं भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले ते म्हणाले की, आमचे बैनर कमी आहेत परंतु आमच्यापाशी कार्यकर्ते भरपूर आहे. यासंबंधात भाजपच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी यावर "आमचा बुथ सगळ्यात मजबुत" या संकल्पनेवर दृढ विश्वास असून "बुथ" कार्यकर्ता हिचं आमची शक्ती असून भाजप कार्यकर्ता दारोदारी, मतदारांच्या घरापर्यंत जाऊन विकास कार्याचा लेखाजोखा मांडून भाजपचे लाडके उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचेसाठी मतरूपी आशिर्वाद मागणार आहे.
अपप्रचार व देखाव्याला आम्ही स्थान दिले नाही. सोशल माध्यमांच्या व्हाटस् अॅप, मेसेज या माध्यमातून केलेल्या विकास कार्याचा पाढा वाचला जात आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर मतदारांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे. "माझं मत विश्वासाला आणि विकासाला... सुधीरभाऊं च्या दुरदृष्टीला...." या आशयाचे मतदारांच्या मोबाईल वर फिरणारे मेसेज व बुथ मजबुत ही भाजपची सगळ्यात मोठी शक्ती आहे. "भाजप" चे तर बैनर चं दिसत नाही जी....!, असे म्हणत कुणी अपप्रचाराला बळी पडू नये. सोशल माध्यमांचे युग आहे, त्यामुळे आधुनिक पद्धतीने होणाऱ्या या प्रचाराला संपूर्ण देशात प्रारंभ झाला आहे.
0 टिप्पण्या