आमदार होण्यासाठी इच्छुकांची गर्दी ! #Crowd of aspirants to become MLA!




चर्चा मात्र जोरगेवारांच्या भुमिकेची...!

चंद्रपूर (वि. प्रति . )
आज सर्वसामान्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या चर्चा होतांना बघायला मिळत आहे. येणाऱ्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील म्हणजे होतीलचं. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा ही विधानसभा क्षेत्रात आमदार होण्यासाठी इच्छुकांची गर्दी झालेली दिसत आहे. जो-तो आपआपल्या क्षेत्रात 'आमचं ठरलयं !' पक्ष आपल्यालाचं पसंती देईल, या आशेने आपापल्या पद्धतीने प्रचाराला लागलेले आहेत. हीचं स्थिती चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे. ७१ - चंद्रपूर मतदार संघात ३९० मतदान केंद्र असुन पुरुष मतदार १८४११९, स्त्री मतदार १७८०१२, इतर- ३५, अशी एकंदर ३ लाख ६२ हजार १६६ मतदार आहेत. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसमधून २१ च्या जवळपास इच्छुक उमेदवार 'आमदार' होण्याचे स्वप्न पहात आहेत. यातील काहींनी तर अप-आपल्या पद्धतीने प्रचाराला प्रारंभ ही केलेला दिसत आहे. किशोर जोरगेवार यांचे अजुन ठरलेले नसुन ते भाजप च्या कमळाची साथ घेतात की महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती देतील ही येणरी वेळ सांगेल, परंतु प्रत्येक भावी आमदारांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र ७२ हजाराचे मताधिक्य घेवून निवडून आलेले चंद्रपूर चे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची एवढ्या गर्दीत ही नावाची चर्चा होतांना दिसत आहे.

भावी आमदारांचा ओढा 'काँग्रेस' कडे !
लोकसभा निकालानंतर काँग्रेस मध्ये अति उत्साहाचे वातावरण आहे. आमदार होण्यासाठी जो-तो काँग्रेसचा 'हात' हाती घेण्यास गर्दी करीत आहे. दोनदा पराभुत झालेले महेश मेंढे यांनी निकाल लागतांक्षणीपासुनचं फ्लैक्स बॅनरच्या माध्यमातुन प्रचाराला(?) सुरूवात केली आहे. चंद्रपूरात वादग्रस्त राहिल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या