१४ पासून बेमुदत आमरण उपोषण !Indefinite hunger strike from 14!


महानगर पालिका चंद्रपूर येथिल प्रतिक्षा यादीत असणारे अनुकंप धारकांना नोकरीत समाविष्ट करा!

अनुकंप कृती समिती तर्फे आयोजन !



चंद्रपूर (का. प्र.)

चंद्रपूर शहर महानगर पालिका येथिल प्रतिक्षा यादीत असणारे अनुकंप धारकांना २३ अॉगस्ट २००८ चा शासन निर्णय ५० टक्के, २५ टक्के, २५ टक्के प्रमाणे १०० टक्के अनुकंप पदभरती करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन अनुकंप कृती समिती तर्फे मनपा समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर येथील सर्व अनुकंप धारकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांना प्रशासनास निवेदन देवून त्यांची वेळोवेळी भेट घेतली परंतु मा. आयुक्त यांनी सर्व अनुकंप धारकांना मराठा आरक्षणा बिंदुनामावली आरक्षीत झाली नसल्यामुळे अनुकंप भरती स्थगिती दिली आहे व महानगरपालिकेच्या आस्थपना येथील बाबुना सुध्दा भेट दिली असता त्यांनी सुध्दा ३ व ४ जागा भरण्याची ग्वाही दिली व त्या संदर्भाना घेवून वेळोवेळी भेट घेत सर्व अनुकंप धारकांना दिलेले आश्वासन सोडविण्यात आले नाही. बुधवार दि. १४ अऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे. वर्ग

क व 'ड' वर्गातील सर्व अनुकंप धरकांना एक विशेष बाब म्हणून शासन सेवेत तात्काळ सामावून घेण्यात यावे. सद्या स्थितीत रिक्त असलेल्या एकुण पदाच्या २० टक्के वर्ग क व वर्ग 'ड' च्या अनुकंप धारकाची पद भरती करण्यात यावी ही मागणी मंजूर होईस्तोवर हे आमरण उपोषण सुरू राहणार असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अनुकंप कृती समिती चे सुजय भारत घडसे, संतोष सुभाष बोरकर, आकाश मधुकर करपे, ओमदेव दिनकर निखाते, शुभम मोरेश्वर गहुकर , अजय अनिल रामटेके,  संगीता खेमराज दुर्गे इत्यादी नी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या