जिल्ह्यात १२३० तर राज्यात होणार ५० हजार योजनादूतांची निवड !
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक योजनादुत !
चंद्रपूर (वि. प्रति . ) : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच प्रचार, प्रसिध्दी थेट नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी 'मुख्यमंत्री योजनादूत' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना शासन आणि नागरिकांमध्ये दुवा बनण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना शासनाकडून दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी 'मुख्यमंत्री योजनादूत' साठी नोंदणी करावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
अशी राहणार कार्यपध्दती : ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १२३० योजनादूत निवडण्यात येणार आहे., मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १० हजार प्रती महिना एवढे मानधन देण्यात येणार आहे. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित), निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाणार असून हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
१३ सप्टेंबरपर्यंत असा करा ऑनलाईन अर्ज !
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी 'मुख्यमंत्री योजनादूत' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील उमेदवारांकडून १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस : मुख्यमंत्री योजनादूत पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील मुख्यमंत्री योजनादूत संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
https://www.mahayojanadoot.org/
वेबसाइटचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच youth पर्यायावर क्लिक करा.
पुढे “Accept the Consent first before entering Aadhar number.” वर क्लिक करून आधार क्रमांक टाका.
आता नोंदणी पेजमध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर Register वर {क्लक करा व प्रोफाइल देखील अपडेट करा.
Matching Jobs वर {क्लक करून आपल्या जिल्ह्यातील योजनादूत भरतीसाठी Apply करा.
वयोमर्यादा : १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
संगणक ज्ञान आवश्यक, उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक., उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे : विहित नमुन्यातील 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड., पदवी उत्तीर्ण असल्याबाबत पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला (सक्षम यंत्रणेने दिलेला), वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल., पासपोर्ट आकाराचा फोटो., हमीपत्र ( ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
0 टिप्पण्या