Action vehicles with black film सावधान...! आता ब्लॅक फिल्म असलेल्या वाहनांवर होणार कारवाई ! Beware...! Action will be taken on vehicles with black film now!


जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पोलीस व आरटीओना निर्देश ! The district collector gave instructions to the police and RTO!

चंद्रपूर (का. प्र.)

वाहन उत्पादकाने वाहनाच्या उत्पादन स्तरावर मोटर वाहन नियम 1989 च्या नियम Motor Vehicles Rules, 1989, 100 मध्ये विहित केल्याप्रमाणे 70 टक्के व 50 टक्के असणाऱ्या काचा पुढील व मागील विंडस्क्रीन साईडच्या खिडक्यांना बसविणे आवश्यक आहे. एकदा वाहन नोंदणी झाल्यानंतर वाहनाच्या विंडस्क्रीन अथवा खिडक्यांच्या काचावर कोणतीही ब्लॅक फिल्म अथवा पेंट करता येणार नाही, जेणेकरून खिडक्यांच्या पारदर्शकतेस अडथळा होईल. असा नियम असताना हि या नियमाचे होताना दिसत नाही, जिल्ह्यातील ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी collector विनय गौडा जी.सी. यांनी पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे.

Click Kara... टोळ्या व रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई सुरू!!

वाहनांच्या काचावर ब्लॅक फिल्म लावून सदर वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून धावत असल्याचे निदर्शनास येते. वाहनांच्या खिडक्या पारदर्शक असाव्यात, असे वाहतूक नियमात नमूद आहे. त्यामुळे ज्या वाहनांच्या खिडक्या आणि विंडस्क्रीनला ब्लॅक फिल्म लावले आहे, त्यांनी तात्काळ आपल्या वाहनावरून ब्लॅक फिल्म, पेंट किंवा इतर स्टिकर वगैरे तात्काळ काढून टाकावे. तपासणी दरम्यान अशा प्रकारचे वाहन रस्त्यावर आढळल्यास या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच कार्यरत अधिकाऱ्याकडून त्याच ठिकाणी वाहनावर असलेली ब्लॅकफिल्म काढण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे RTO kiran More यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या