जाहीरनाम्याऐवजी ‘अंमलबजावणी आराखडा’!
चंद्रपूर (वि.प्र.)
पुढील महिन्यात २० ला महाराष्ट्रातील २८८ जगासाठी एका टप्प्यात निवडणुका होणार आहे. या निवणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने सुधीर मुनगंटीवार mungantiwar यांच्यासह डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, माधव भांडारी madhao Bhandari, अॅड. उज्ज्वल निकम ujwal Nikam, डॉ. भारती पवार, सुभाष देशमुख, माधवी नाईक, दिलीप कांबळे, धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, धनंजय मंगरूळे, केशव उपाध्ये, अनिल सोले, anil sole नरेंद्र पवार यांच्यासह ३० सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन केली आहे.
Click....गद्दारांची होणार हकालपट्टी!
मुनगंटीवार यांच्या कामाची पावती !
सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर निर्वाचन क्षेत्राचे मागील तीन खेपेपासून प्रतिनिधित्व करीत आहे. अभ्यासू व विकास कामाचा ध्यास असलेले नेतृत्व त्यांची ओळख आहे. आपल्या सतत काम करण्याच्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रदेशाच्या जाहीरनामा समिती स्थापन करून त्यात त्याची लागलेली वर्णी ही त्यांच्या निष्ठेने व अभ्यासू कामाची पावती आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याऐवजी भाजपने BJP त्याचे स्वरूप ‘अंमलबजावणी आराखडा’ असे करण्याचे निश्चित केले आहे. पारंपरिक जाहीरनाम्याच्या पुढे जाऊन त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल, याचा दस्तावेज यानिमित्ताने तयार होत असल्याची माहिती नुकतीच सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्वात समिती सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘आराखड्यासाठी नागरिकांनी आणि मतदारांनी पक्षाकडे सूचना पाठवाव्यात, त्याचा समावेश जाहीरनाम्यात केला जाईल,’ असे आवाहनही त्यांनी केले.परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने दिली जातात. मात्र सत्तेत पुन्हा येण्यासाठी संकल्पातून जाहीरनामा करण्याचा आणि त्याची अंमलबाजवणी करण्याचा आराखडा भाजपकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी ३० सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली मुनगंटीवार यांचे नेतृत्वात या समितीने नुकतीच मुंबई येथे परिषद घेऊन याची माहिती दिली.
0 टिप्पण्या