प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा व उद्योग जगतातील इतर मान्यवरांच्या हस्ते होणार २७ ला पुरस्कार प्रदान!
चंद्रपूर (का.प्र.) : मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या एक दशकात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उद्योग जगतातील स्विफ्ट कॅन्डी लिफ्ट मिडीया सोल्युशन (Swift & Lift media Solution) च्या वतीने विदर्भामधुन चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील Satish betwar सतीश बेतवार यांना रविवार दि. २७ आॅक्टोंबर ला "बिझनेस अवॉर्ड" या पुरस्काराने चिटणीस बिजनेस हब, नागपूर nagpur येथे प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा jayaprada व उद्योग जगतातील इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायात विशेष कार्य केल्यामुळे सतीश बेतवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे विदर्भातील असा पुरस्कार प्राप्त करणारे सतीश बेतवार हेएकमेव व्यक्ती आहे. त्यांच्या या मत्स्यपालनातील नावीन्यपूर्ण संकल्पनेची व त्यांना मिळत असलेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदन च्या वर्षाव होत आहे.
सतीश बेतवार कार्याचा थोडक्यात परिचय !
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यामधील गडचंदुर येथील सतीश बेतावार यांनी सन 2013 मध्ये श्री नागेश्वर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित बैलमपूर या संस्थेचे व्यवस्थापक पद सांभाळून मत्स्य व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा अभ्यास केला व घोडदौड सुरु केली. सर्वप्रथम त्यांनी सन 2018 मध्ये मार्कंडेय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था गडचांदूर ची स्थापना केली.व ते अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी मत्स्य व्यवसायिकांना व मासेमार बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना त्यांनी राबविल्या. त्यांना विविध प्रकारचे मासेमारी व मत्स्यपालन याचे प्रशिक्षण दिले. सहकारातून समृद्धी व मत्स्यपालनातून रोजगार ही संकल्पना त्यांनी राबवली. मासा वाढविणे वर त्यांनी भर दिला. 2021 मध्ये त्यांनी काही मासेमारी बांधवांना व सहचारिणी ला सोबत घेऊन मास्यांपासून आचार (लोणचे ) तयार करणारा Amal Nala Fish Pickle हा गृह उद्योग सुरु केला. आजही सदर लोणच्याला मोठी मागणी आहे.आज मत्स्य जगतात जिवंत मासळी ला मोठे महत्व आले आहे. जिवंत मासे खाणारा वर्ग मोठा असल्याने आपल्या सहचारिणीचे नावे सन 2022-23 च्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत 20 लक्ष रुपयाचे जिवंत मासळी विक्री केंद्र खरेदी करून खवय्यांना जिवंत मासळीची विक्री व्यवस्था सुरु केली आहे. नुकतेच काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन इजराइलच्या धर्तीवर विकसित झालेले केज कल्चर प्रोजेक्ट (बंदिस्त मत्स्यपालन) गडचांदूर येथील अंमलनाला तलावात सुरू केले आहे. यापासून आवश्यक तेव्हा व मागणी असलेले जिवंत मासे उत्पादित करीत आहे.
मत्स्य व्यवसाय क्षेत्रात मत्स्य बीजाला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे व महाराष्ट्रात मत्स्यबीजाला मोठी मागणी असल्यामुळे व विदर्भातील मत्स्यबीज मागणी पूर्ण करण्यासाठी मार्च 2024 मध्ये शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र अमल नाला 2024-2049 अशा 25 वर्षाकरिता भाडेतत्त्वावर घेऊन 5 कोटी मत्स्यबीज निर्मिती करून विदर्भातील विविध मच्छिमार संस्था व मत्स्य शेतकरी यांची मत्स्यबीज मागणीची तुट भरून काढली. याबद्दल मत्स्य व्यवसाय विभागाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या