काँग्रेस उमेदवार निराशेच्या 'सावटात'...! Congress candidate 'in the grip' of despair...!



मुनगंटीवार mungantiwar व भांगडिया bhangdiya ची उमेदवारी जाहीर !

चंद्रपूर (वि. प्रति . )

काल रविवार दि. २० रोजी महायुती मधील घटक पक्ष असलेल्या भाजपने आपली पहिली ९९ जनांची यादी जाहिर केली बल्लारपूर येथून सुधीर मुनगंटीवार व चिमूर येथून बंटी भांगडिया यांच्यासह विदर्भातील २३ उमेदवारांचा समावेश आहे. महाआघाडीतील घटक पक्षांचे अजुन ठरले नसल्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या धाबे दणाणले आहे. संभाव्य उमेदवार निराशेच्या सावटात असल्याचे दिसत आहे. बल्लारपूर मधून काँग्रेस च्या इच्छुक उमेदवारांमध्ये संतोष रावत व अभिलाषा गावतुरे या आघाडीवर आहेत. वडेट्टीवार समर्थक असलेले संतोष रावत हे प्रचार साहित्यासह कामाला लागले असुन त्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या फळीकडून उमेदवार म्हणुन रावत यांच्या नावालाचं पसंती मिळेल असे सांगण्यात येत असुन रावत santosh Rawat यांचे 'गॉडफादर' असलेले 'विजय वडेट्टीवार यांचा आशिर्वाद देणारा हात कां बरे सैलावला असेल...?' अशी चर्चा ही आता रावत समर्थकांमध्ये होऊ लागली आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुक निकालानंतर पासुनचं डॉ. अभिलाषा गावतुरे abhilasha gavture यांनी गावोगावी प्रचार कार्यास सुरूवात केली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास कामाला लागलेल्या आपल्या कार्यकर्त्यासह डॉ. गावतुरे या अपक्ष म्हणुन आपली उमेदवारी दाखल करतील एवढा उत्साह डॉ. गावतुरे यांचा कार्यकर्त्यांमध्ये दुणावला आहे. परंतु पक्षश्रेष्ठी कोणत्या उमेदवारांमध्ये 'संतोष' मानतात या चिंतेच्या सावटात आजच्या स्थितीत आहे ? महाआघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना उभाटा गटाकडून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे हे सुद्धा बल्लारपूर विधानसभेतून ballarpur vidhansabha निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे आघाडीमध्ये मनभेद झाल्यास आघाडी संदीप गिऱ्हे sandip girhe यांनाही बल्लारपूर मधून आपला उमेदवार घोषित करू शकते. अशी शक्यता आज तरी वर्तविले जात आहे. भाजपचे उमेदवार मुनगंटीवार यांना पक्षाने वचननामा (जाहिरानामा) समितीचे प्रमुख पद दिल्यानंतर नुकतेच मुंबई येथून जिल्ह्यात पदार्पण केले असुन पपदाधिकारी-कार्यकर्तेयांच्या रात्रो उशिरापर्यंत बैठका, नियोजन याकडे आपले लक्ष केंद्रित केले असुन सुक्ष्म नियोजन करीत कोणत्याही गोष्टीकडे 'दुर्लक्ष (?)' होऊ नये यावर मुनगंटीवार स्वतः लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.

Click & Read.....माविआ म्हणजे कारण सांगून अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी !

निष्ठावान कार्यकर्ते व नोकिया चा हॅन्डसेट भेटत बी नाही... अन् दिसत बी नाही.... !


मुनगंटीवार यांचा पराभव निश्चित... ?

यावेळी 'मुनगंटीवार यांना पराभवाचा सामना करावा लागेल.... ?' अशी उमेदवार न ठरलेल्या काँग्रेस व अन्य पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हास्यास्पद भविष्यवाणी करू लागले, ही बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील सगळ्यात मजेशीर बाब बघायला मिळत आहे. इच्छुकांची गर्दी व उमेदवारी ची मोठी प्रतिक्षा यामुळे काँग्रेसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार असे आजचे चित्र आहे. यात चंद्रपूर जिल्हा ही सुटलेला नाही. जिल्ह्यातील सहा ही विधानसभा काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 'अभी नाही तो कभी नही' एवढे वर्ष पक्षाशी निष्ठावान राहिलो पक्षाने नेहमी थांबायला सांगीतले दिलेल्या उमेदवारांचे काम करायला सांगीतले ते निष्ठेने पुर्ण केले. आता वय झाले आहे. आता नवख्या उमेदवाराला तिकीट देत असेल तर खपवुन घेणार नाही. बंडखोरी करणार नाही पण पक्षाचे काम करणार नाही. या भावनेने ग्रासलेल्यांची  काँग्रेसकडे 'रांग' आहे यातुन बल्लारपुर विधानसभा क्षेत्र ही सुटलेले नाही. अनेक संकटे कोसळुन ही पक्षाची साथ न सोडणारे संतोष रावत यांना उमेदवारीपासुन डावलल्यास पक्ष त्यांच्यावर मोठा अन्याय करेल अशा भावना आता व्यक्त होवू लागल्या आहेत.

वंचित चे उमेदवार ठरले !

बहुजन वंचित बहुजन आघाडी कडून बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्तेसतीश मालेकर यांना मुनगंटीवार यांच्याविरोधात तिकीट दिले आहे. तर चिमुर मधून माना समाजाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे पुर्व विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर यांना तिकीट दिल्याची माहिती आहे. सन २०१९ मध्ये सांदेकर यांनी निवडणुक लढविली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या