पुन्हा चर्चा... जोरगेवारांच्या नावाची व साहेबांच्या 'नादाची'...! Discussion again... Georgewar's name and Saheb's 'sound'...!



चंद्रपूर (वि. प्रति.)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ आलेली असुन अद्याप ही महायुती - महाविकास आघाडीचा काही जागावरचा तिढा कायम असल्याचे दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभेमध्येतील चंद्रपूर विधानसभेचा तिढा अजुन सुटला नाही तर नुकतीच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शरदचंद्र पवार यांची भेट घेवून त्यांना पक्षश्रेष्ठींनी 'वेट अॅन्ड वॉच' ठेवले असुन अपक्ष म्हणुन चंद्रपूरातुन मागील विधानसभा निवडणुकीत रेकॉर्ड मताधिक्याने निवडून आलेले किशोर जोरगेवार KISHOR jorgewar यांना कोणताही पक्ष 'जवळ' घेण्यास तयार नसल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जोरगेवार हे अपक्ष लढतील यात कवडीमात्र ही शंका नाही. अल्प घटकाची फडणविस devendra fadnvis सरकार, उद्धव ठाकरे udhao Thakre, गुवाहाटी फेम एकनाथ शिंदे shinde सरकार या सर्वांसोबत राहुन त्यांनी त्यांनी आपल्या केलेल्या 'अनुभवा'त वाढ यामुळे जोरगेवार यांच्यावर ही परिस्थिती उद्भवली हे स्पष्ट आहे. आमदार झाल्यानंतर किशोर जोरगेवार यांची भुमिका स्पष्ट राहिली नाही, त्यामुळे त्यांना आता ही भटकती करावी लागत आहे. राजकीय पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी आपण अपक्ष निवडणुक लढवू असे आपले मत त्यांनी यापुर्वी माध्यमांना दिले आहे. मग विविध राजकीय पक्षांकडे लाचारी पत्करून राजकीय पक्षांचे 'द्वार' कां बरे ठोठावत आहे ? पाच वर्ष जनतेचे प्रतिनिधीत्व करून सुद्धा अद्याप निर्णय घेण्यात 'सक्षम' नाहीत की अपक्ष लढून मागील खेपेसारखा 'विजय' पदरात पाडून घेऊ असा आत्मविश्वास त्यांच्यात आज नाही अशी चर्चा ही आता नागरिकांमध्ये होवू लागली आहे.

CLICK...... काँग्रेस उमेदवार निराशेच्या 'सावटात...!

निष्ठावान कार्यकर्ते व नोकिया चा हॅन्डसेट भेटत बी नाही... अन् दिसत बी नाही.... !

जोरगेवारांवर कोसळलेल्या (स्वतः उद्भवून घेतलेल्या.....?) या संकटातुन स्वतःला आपणचं सर्व काही समजणाऱ्या 'बेताल' राजकारण्यांनी खऱ्या अर्थाने 'बोध' घ्यायला हवा. जनतेच्या अपेक्षांना, इच्छा-आकाक्षांना बगल दाखविणाऱ्यांना, तीच जनता मतदानांच्या रूपाने त्यांची 'जागा' दाखवित असते. याच जनतेने आपल्याला त्यांचा प्रतिनिधी बनविले आहे, ते आपल्याला 'घरचा रस्ता' दाखवु शकतात, याचा विसर पडू देता कामा नये, हे यानिमीत्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

CLICK.....आमदार होण्यासाठी इच्छुकांची गर्दी ! चर्चा मात्र जोरगेवारांच्या भुमिकेची...!

काहीही असो जोरगेवार यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू होवून जोरगेवारांसाठी वातावरण निर्मीती होत आहे. ही वास्तविकता आहे. जोरगेवार कुठून उमेदवारी दाखल करतील त्यानंतरचं भाजप व अन्य पक्ष आपली उमेदवार जाहीर करतील, एवढी धास्ती तरी जोरगेवारांविषयी मोठ्या राजकीय पक्षांमध्ये आहे, हे नाकारता येत नाही. शरद पवार यांनी जोरगेवार यांना चर्चेसाठी बोलाविल्यानंतर जोरगेवार यांच्या हाती 'तुतारी' मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु शरद पवार यांनी जोरगेवार यांना 'वेट अॅन्ड वॉच' ची भुमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर राजकीय संकट कोसळले या चर्चेला वेग आला आहे. एकीकडे स्थानिक नेत्यांच्या विरोधांमुळे शरद पवार sharad pawar यांना ही भुमिका घ्यावी लागली असे म्हटल्या जात आहे परंतु त्यात तथ्य नाही तर दुसरीकडे महाआघाडीमधील काँग्रेसच्या वाट्याला चंद्रपूर ची जागा मिळावी यासाठी वरोरा-भद्रावती विधानसभेची उमेदवारी पक्षाने जाहिर न करता ही आपल्या सख्ख्या भावाला (प्रविण काकडे) उमेदवारी दाखल करण्यास लावणाऱ्या काँग्रेसच्या चंद्रपूरच्या निष्ठावान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शिष्टमंडळाला घेवून काँग्रेस पक्षाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)च्या राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जोरगेवार यांना उमेदवारी न मिळण्यासाठी 'फिल्डींग' लावल्या जात आहे एवढे जोरगेवारांचे महत्व वाढले आहे. यामुळे जोरगेवार 'वजन' दार नेते झाले असल्याची बोलल्या जात आहे.

साहेबांच्या ‘नाद’कडे स्थानिकांचे दुर्लक्ष !

चंद्रपूरातील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस ला चंद्रपूर नाही तर बल्लारपूर ची जागा लढायची आहे. मागील तिन वेळेपासुन भाजपच्या ताब्यात असलेली व महाराष्ट्रातील वजनदार नेते सुधीर मुनगंटीवार यांचेविरोधात बल्लारपूर येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला उमेदवारी मिळावी यासाठी राकाँचे नेते आग्रही आहेत. 'साहेबांचा नाद' याकडे स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. बल्लारपुरातुन उमेदवार देण्यापेक्षा मुख्यालय असलेल्या चंद्रपूरातून आपला उमेदवार देऊन मुख्यालय काबिज करण्यावर 'साहेबांचा' भर असु शकतो, त्यामुळे एका 'तिर' मध्ये 'दोन' पक्षी मारले जाऊ शकण्याचा डाव साहेबांकडून खेळला जाऊन ऐन वेळेवर किशोर जोरगेवार यांचे हाती 'तुतारी' मिळू शकते अशी शक्यता राजकीय जानकर आता व्यक्त करू लागले आहे. 'साहेबांचा नाद' बघता ही शक्यता नाकारता येत नाही. 'साहेबांचा नाद' व 'जोरगेवारांची चर्चा' यावर पुर्णविराम लागू शकतो.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या