Elderly people in old age homes वृद्धाश्रमातील वृद्धांना मिळाला आधार निराधार योजनेचा...! Elderly people in old age homes got Aadhaar support scheme...!


जिल्हा विधी सेवा प्राधिकरण District Legal Service Authority!  चा स्तुत्य उपक्रम! 

डेबु सावली, देवाडा येथे अनोखा आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा ! Unique International Elderly Day celebration at Debu Sawli, Devada!

चंद्रपूर (वि. प्रति . )

शासनातर्फे अनेक जनहितोपयोगी योजना राबविल्या जातात परंतु त्या योजनांचा लाभ जनजागृती अभावी म्हणा की शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनास्थे (खाबुगिरी)मुळे म्हणा शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याची किमया अद्यापतरी शासन-प्रशासनाला किंवा सामाजिक कार्यकर्त्याला जमली नाही. अनेक लाभार्थी तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या "खाबुगिरी"ने वैतागुन योजनांची अपेक्षा सोडून देतात. निराधारांना आधार देणारी अशीच संजय गांधी निराधार योजना शासनातर्फे राबविली जाते. अनेक जण याचा लाभ घेत असले तरी आणखी बरेचशे जण खाबुगिरी ला वैतागुन या योजनेच्या लाभापासुन वंचित राहतात. चंद्रपूर शहरातील देवाडा यथे डेबू सावली वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमांत अनेक निराधारांना आसरा देण्याचे पवित्र कार्य या वृद्धाश्रमांच्या संचालकांकडून मागील काही वर्षापासुन निःस्वार्थपणे अविरत सुरू आहे.

याचं वृद्धाश्रमात चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण District Legal Service Authority कार्यालयाचे सचिव सुमीत जोशी यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली असता ज्येष्ठ नागरिकांनी निराधार योजनेचा लाभ कसा मिळू शकेल, अशी विचारणा केली आणि शासनाच्या निराधार योजना राबविण्याच्या प्रक्रियेला जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार प्रारंभ झाला. चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार vijay pawar यांनी संजय गांधी निराधार योजना व अन्य काही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली, त्यानंतर आवश्यक कागदपत्रे व विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे राहुल शिरसागर तथा नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार व इतर कर्मचारी हे डेबू सावली  Debu Sawli येथील वृद्धाश्रमात पोहोचले आणि त्यांनी तेथे जाऊन संबंधित वृद्धांचे अर्ज भरून घेतले व संबंधित विभागात दाखल केले. प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण करण्याकरिता अधिवक्ता महेंद्र आसरे व धनंजय तावडे dhananjay Tawade यांनी सहकार्य केले. वृद्धांचे बँक खाते नसल्यामुळे बँक ऑफ इंडिया शाखा जटपुरा गेट चे शाखाधिकारी मनोज पाठवते यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सुद्धा वृद्धांसाठी वृद्धाश्रमात जाऊन बँक खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण केली. याप्रमाणे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले. विविध अडचणींवर मात करीत कागदपत्रांची जुळवाजुळव करून सादर करण्यात आल्यानंतर तहसील कार्यालयामार्फत १६ वृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मिळण्यासाठीचे आदेश पारित करण्यात आले. सदर आदेशाची प्रत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले.  डेबु सावली वृद्धाश्रमात अनेक जण आपला-मुलाचा जन्मदिन, लग्नाचा वाढदिवस व अन्य कार्यक्रम साजरे करीत असतात. परंतु निराधारांना त्यांच्या हक्काच्या शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊन अनोख्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय वृद्ध दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील १६ ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या निराधार योजनेअंतर्गत मंजुरी आदेश प्रदान करण्यात आले व ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार राजू धांडे, खंडाळे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी मनोज पाठवते, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी उपस्थित होते.

‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणे निराधारांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने केलेल्या या स्त्युत्य उपक्रमाला तहसिल विभाग व बँक कर्मचाऱ्यांची साथ मिळाली व निराधार वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान मिळवून देता आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या स्तुत्य उपक्रमापासुन अनेकांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाची करावी तेवढी प्रशंसा कमी आहे. सामाजिक कार्यकर्त्यासाठी ही बाब प्रेरणादायी अशीचं आहे.

--------------------------

बातमीवर click करा व वाचा..

७ पासुन माता महाकाली महोत्सव-२०२४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या