आज रविवार दि. २० ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार jorgewar kishor यांच्या मातोश्री गंगुबाई जोरगेवार gangubai jorgewar यांचे रोजी वृद्धापकाळाने सकाळी ९.४५ वाजता निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा उद्या सोमवार ला सकाळी 09.00 वा. राजमाता निवासस्थान कोतवाली वॉर्ड येथून दस्तगिर दर्गा ह, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गे अंतिम यात्रा निघून शांतिधाम येथे अंतिम संस्कार होणार आहे. त्यांनी केलेल्या संघर्षातुन त्यांनी 'जीवनाचा डोलारा' यशस्वीपणे पार पाडला होता. तो प्रेरणादायी असाच आहे. जोरगेवार परिवारावर कोसळलेल्या या संकटात साप्ता. विदर्भ आठवडी परिवार सहभागी आहे. परमात्मा मृतात्मास शांतीप्रदान करो हीच यानिमीत्त त्यांना श्रद्धांजली !
संघर्षयात्री गंगुबाई जोरगेवार प्रेरणादायी संघर्षशील प्रवास !
गंगुबाई जोरगेवार (अम्मा), अत्यंत संघर्षांत जीवन यापन करणाऱ्या चंद्रपूर च्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री ! त्यांचा संघर्ष हा अनेकांसाठी आयुष्यात खचुन न जाता जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी असाच आहे. त्यांच्या या संघर्षशील जीवनाची प्रेरणा घेत चंद्रपूरात 'राहो वा कुणी भुकेला उपाशी' या उद्दात्त हेतूने आ. किशोरभाऊ जोरगेवार यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने चंद्रपुरात एका ईश्वरीय कार्याची सुरुवात केली. चंद्रपूर मधील कुठलीही निराधार माता व वृध्द ज्यांना कुठलाही कौटुंबिक आधार नाही. पालन पोषण करणारी माता पित्याची जवाबदारी न घेणारे, दोन वेळेचे जेवण सुद्धा ज्यांना मिळत नाही. कुठलेही योजनेतील राशन व इतर कोणतेही मानधन ज्यांना मिळत नाही. संपूर्णताः निराधार असलेल्या ६० वर्षावरील वृद्धांकरिता आमदार किशोर जोरगेवार यांनी 'अम्मा का टिफिन योजना' amma ka tifan सुरु केली. दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी स्व:तच्या जन्मदिवशी आ. जोरगेवारांनी या ईश्वरीय कार्याला सुरवात केलेली आहे. आजतागायत सुमारे १२० नेराधार गरजू लोकांना रोज न चुकता टिफिनव्दारे घरपोच जेवणाची व्यवस्था पाठविण्यात येत आहे. आणि महत्वाचे भाग म्हणजे या भोजन व्यवस्थेतील सर्व वस्तू आमदार महोदयांच्या घरी उपयोगात आणल्या जाणारे आहेत. राशन, किराणा व भाजीपाला सुद्धा उच्च दर्जाचा उपयोग केल्या जातो. सर्वप्रथम ज्या निराधार व्यक्तींचे नावे कार्यालयात प्राप्त होतात. व त्यांचे संपूर्ण तपशिलवार माहिती चितल्या जाते. नंतर या निराधारांची व त्यांच्या नातेवाईकांची माहिती घेण्याकरिता समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीच्या चौकशीद्वारे संपूर्ण माहिती एकत्रित करून पात्र निराधार व्यक्ती ठरवितात. नंतर लगेच त्यांना 'अम्मा का टिफिन' व्यवस्था सुरु करण्यात येते. भोजन बनविणे व घरपोच टिफिन पोहचविणे या करिता १० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. उच्च दर्जाचे आधुनिक स्वंयपाक गृह या व्यवस्थेकरिता उभे करण्यात आलेले आहे. या संपूर्ण व्यवस्थेत आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या धर्मपत्नी सौ. कल्याणी किशोर जोरगेवार व त्याची भावसून सौ. रंजिता प्रशांत जोरगेवार या व्यक्तिगत लक्ष घालून या व्यवस्थेत असतात. या उपक्रमाच कौतुक संपूर्ण चंद्रपूर शहरात केल्या जात आहे. आईने म्हणजेच श्रीमती गंगुबाई जोरगेवार (अम्मा) यांचा संघर्षमय जीवन वास व गरिबीत काढलेले जीवन याची जाणीव ठेऊन केवळ अम्माच्या एकच इच्छेपोटी या ईश्वरीय कार्याला आ. किशोरभाऊंनी सुरुवात केली व त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केवळ हा उपक्रम घायला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बारामतीच्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, हाराष्ट्राचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार व माजी मंत्री जयंत पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून भोजनाची चव घेत या ईश्वरीय चर्याची मुक्त कंठाने प्रशंसा करीत कौतुक केले आहे. डिसेंबर २०२० पासुन चंद्रपूरात सुरू असलेला 'अम्मा का टिफन' आज ही आजतागायत अविरत सुरू आहे. भुकेल्यांच्या पोटाला आसरा म्हणून सामाजिक कृतज्ञाची जाणिव ठेवित सुरू आहे. आज त्यांना मृत्युने कवटाळले. वृद्धापकाळाने अम्मांला मृत्युने कवटाळले. जोरगेवार परिवारावर कोसळलेल्या या संकटसमयी त्यांना धीर मिळो व मृतात्म्यास शांती मिळो..! हीच भावपुर्ण श्रद्धांजली !!
0 टिप्पण्या