आजपासून आदर्श आचारसंहिता लागू ! Ideal code of conduct applicable from today!



२० नोव्हेंबरला निवडणुका जाहीर !

चंद्रपूर (का.प्रति.)
जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा Maharashtra election सार्वत्रिक निवडणूक - 2024 ची आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन करण्याचे दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 मधील तरतुदीनुसार खालील बाबींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी collector विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमीत केले आहेत.


1. शासकीय कार्यालये/विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा देणे/सभा घेणे इत्यादीवर निर्बंध राहतील. 2. शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निर्बंध, 3. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळीस ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त मोटारगाडया/वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मिटर परिसरात व दालनात 5 व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध राहतील. 4. निवडणुक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत इतर उमेदवाराचे नाव व चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चीत केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच निश्चीत केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रीका छपाईस निर्बंध राहतील. 5. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इतर उमेदवारांचे नाव व चिन्ह symbol वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच निश्चित केलेल्या कागदपत्राच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध,6. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 200 मी. परिसरात धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषणे करण्यावर निर्बंध राहतील.

6. धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध, 7. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जात/धर्म/भाषावार शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध, 8. निवडणुकीचे प्रचाराकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निर्बंध, 9. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खाजगी व्यक्तींच्या जागेवर/सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधीत प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय लावण्यास निर्बंध राहतील. 10. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार/रॅली/रोड-शो याकरीता वाहनाच्या ताफ्यात 10 पेक्षा अधिक मोटार गाडया/वाहने वापरण्यास निर्बंध राहतील.

सदर आदेश जिल्हाधिकारी यांच्या सहीनिशी कोर्टाच्या शिक्कानिशी 15 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या