चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम.... ! Innovative initiative of Chandrapur district administration....!

 


शासनाच्या विविध योजनांची माहिती आता व्हाट्सअप WhatsApp! वर 24 तास उपलब्ध !

चंद्रपूर (का. प्र.) :

शासन अनेक जनहितकारी योजना राबविते परंतु या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. लाभार्थी त्या पासून वंचित राहतात. शासनाची योजना अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत चंद्रपूर जिल्ह्यात एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आता घरबसल्या मोबाईलवर 24 तास उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्हाट्सअप चाटबोर्ड क्रमांक 94 22 47 57 43 हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, त्याचे फायदे, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल.

अशी आहे राबविण्यात येणारी प्रक्रिया : संभाषण सुरू करण्यासाठी Hi टाईप करा. कृपया भाषा निवडा. योजनांची माहिती मिळण्यासाठी या योजनेचा क्रमांक टाईप करा. जसे, 1. मुख्यमंत्री वयोश्री योजना, mukhyamantir vayoshri yojna 2. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, mukhyamantir tirhthayatra yojna 3. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, 4. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, mofat vij yojna 5. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, 6. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना, 7. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,mukhyamantir ladki bahin yojna 8. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 9. आयुष्यमान भारत योजना, ayushyaman bharat yojna 10 स्वच्छ भारत अभियान, 11. दीनदयाल अंत्योदय योजना, 12. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, p.m. kisan yojna 13. किसान क्रेडिट कार्ड योजना, kisan credit card 14 खेलो इंडिया, khelo  India15. जनधन योजना, jandhan yojna 16. जीवन ज्योती विमा योजना, 17. सुरक्षा बीमा योजना, 18. अटल पेन्शन योजना, atal pension yojna 19 पीएम मुद्रा प्रधानमंत्री, 20. प्रधानमंत्री आवास योजना, 21. प्रधानमंत्री पोषण अभियान. pradhanmantri  poshan yojna

click टोळ्या व रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई सुरू!

असा होणार नागरिकांना लाभ : 24 बाय 7 सेवा उपलब्ध, तत्पर प्रतिसाद, उत्तरांमध्ये सातत्य, मानवी मदतीशिवाय ऑर्डर दिली जाऊ शकतात, वैयक्तिकरण, एकाच वेळी अनेकांशी संवाद साधने शक्य, वेळेची बचत, आधुनिक एपीआय मुळे समाकलित करणे सोपे.

click सावधान...! आता ब्लॅक फिल्म असलेल्या वाहनांवर होणार कारवाई !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या