Mata Mahakali Festival ७ पासुन माता महाकाली महोत्सव - २०२४ ! Mata Mahakali Festival - 2024 from 7!

 


प्रसिद्ध गायक अनुप जलोटा, प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा, हंसराज रघुवंशी यांच्या कार्यक्रमाची मेजवाणी

चंद्रपूर (का. प्रति.)

श्री माता महाकाली माता महोत्सव ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने नवरात्रोत्सवानिमीत्त ७ ते ११ ऑक्टोंबर पर्यंत पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सव २०२४ चे संयोजक किशोर जोरगेवार, (आमदार चंद्रपूर विधानसभा)  आयोजक श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट, चंद्रपूर च्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. मागील वर्षापासुन चंद्रपूर ची जागृत आराध्य दैवत माता महाकाली महोत्सवाचे आयोजन  चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती राहते. यावर्षी ही ७ ते ११ ऑक्टोंबर पर्यंत या महोत्सवाचे पाच दिवसीय आयोजन करण्यात आले आहे.

 विशेष कार्यक्रम :-सोमवार दि. ७ ऑक्टोंबर ला जगप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा Anup  Jalota यांचे भजन गायन व अन्य कार्यक्रम., मंगळवार दि. ८ रोजी :'राम आयेंगे राम आयेंगे' या गाण्याची प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा Swati Mishra यांचा भक्तिमय संगीत कार्यक्रम. बुधवार दि. ०९ ऑक्टोंबर  'मेरा भोला है भंडारी' या प्रसिद्ध गाण्याचे गायक हंसराज रघुवंशी Hansraj  Raghuwanshi यांचा भक्तीमय कार्यक्रम, गुरुवार दि. १० ऑक्टोंबर  'मुझे चढ गया भगवा रंग' या गाण्याची प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर  Shahnaz akhtar यांचा लाईव्ह रोड शो, शुक्रवार  दि. ११ऑक्टोंबर तरुणांचे प्रेरणास्थान युवा कीर्तनकारचैतन्य महाराज वाडेकर Chaitanya maharaj Wadekar यांचे कीर्तन

या कार्यक्रमात सोमवार दि. ७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ०७.०० वाजता जैन मंदिर संस्था व सराफा असो. चंद्रपूरच्या वतीने श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूतीची शोभायात्रेने कार्यक्रमास प्रारंभ होणार असून  सकाळी ९.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते ५१ फुट उंचीच्या व श्री माता महाकाली महोत्सव ध्वजाचे ध्वाजारोहण, श्री माता महाकाली मूतीची प्रतिष्ठापना व श्री माता महाकाली महोत्सवाचे उद्घाटन, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० पर्यत नवरात्रौत्सव दरम्यान ज्या परिवारामध्ये कन्यारत्न जन्मास येतील त्या सर्व कन्यारत्नांना मान्यवरांच्या हस्ते चांदीचे नाणे वितरण, मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार समारंभ सोहळा, आरोग्य शिबिराचे उद्घाटन, चित्रकला व चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन. ( सहयोग - म. रा. कलाध्यापक संघ, जि. चंद्रपूर). दुपारी ०१.०० ते दुपारी ०२.३० पर्यत : देवी चे नव स्वरुप यावर संगीतमय प्रवचन. ( सहभाग सौ. गायत्री सुमेध कोतपल्लीवार) दुपारी ०२.३० ते सायं ०५.०० पर्यत : शालेय विद्याथी व विद्याथीनी यांचे धार्मिक, सायं ०५.०० ते सायं ०६.०० पर्यत सायं ०६.३० ते रात्रौ १०.०० पर्यत सांस्कृतिक व सामाजिक विषयावर सामुहिक नृत्य, श्री माता महाकालीची आरती व भजन. (सादरकर्ते - श्री माता महाकाली जागरण ग्रुप, चंद्रपुर, जगप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांचे भजन गायन)

मंगळवार दि. ८ रोजी : भजन व श्री माता महाकालीची आरती ( सादरकर्ते श्री माताजी निर्मला परमेश्वरी संगीत गुप, चंद्रपूर) : ९९९ जेष्ठ माय माऊलींचा सन्मान सोहळा, (सहभाग जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, चंद्रपूर) : 'जागर कवितेचा महिलांचे कवी संमेलन. सहभाग : सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर व झाडीबोली गुप. ' नृत्य जल्लोष' स्थानिक कलावंतांची प्रस्तुती, भजन व श्री माता महाकालीची आरती (सादरकर्ते गुरुसाई भजन मंडळ, चंद्रपूर) तसेच रात्रो : 'राम आयेंगे राम आयेंगे' या गाण्याची प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांचा भक्तिमय संगीत कार्यक्रम, बुधवार दि. ०९ ऑक्टोंबर रोजी श्री माता महाकालीची आरती व भजन. (सादरकर्ते : महेश भज लखमापूर हनुमान मंदिर द्वारा 'सुंदरकांड', सायबर सेल चंद्रपुर च्या वतीने महिलांना मार्गदर्शन. : शिव्यामुक्त समाज अभियान जागरुकता कार्यक्रम सहभाग राणी हिराई विद्याथी विकास मंच, एस. आर. एम कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपुर, कायदेविषयक मार्गदर्शन श्री माता महाकालीची आरती व भजन. (सादरकर्ते : मुन्ना मास्टर भजन मंडळ, चंद्रपूर) : 'मेरा भोला है भंडारी' या प्रसिद्ध गाण्याचे गायक हंसराज रघुवंशी यांचा भक्तीमय कार्यक्रम, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, चंद्रपुर. गुरुवार दि. १० ऑक्टोंबर रोजी श्री माता महाकालीची आरती व भजन ( सादरकर्ते : श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, चंद्रपूर .) शक्ती संवर्धन पर्यावरण संरक्षण महायज्ञ ( सहयोग गायत्री परिवार, चंद्रपूर.), श्री माता महाकाली महोत्सव २०२४ संपन्न करणाऱ्या स्वयंसेवकांचा सन्मान सोहळा. : श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखीला प्रारंभ, नगर प्रदक्षिणा पालखी मार्ग (श्री माता महाकाली मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, जटपुरा गेट, कस्तुरबा रोड मार्ग, कस्तुरबा चौक ( गिरनार चौक) मार्ग श्री माता महाकाली मंदिर येथे सांगता.), श्री माता महाकाली महोत्सव नगर प्रदक्षिणा पालखी सोहळा रथ., श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूतीचा व चांदीच्या पालखीचा समावेश., पालखी सोहळ्यात काशी येथील प्रसिद्ध गंगा आरतीचा समावेश, मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन ज्योतिर्लिंग येथील झांज डमरु पथक. * पालखी सोहळ्यात पोतराजे नृत्य, 'मुझे चढ गया भगवा रंग' या गाण्याची प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा लाईव्ह रोड शो, हरियाना राज्यातील महामृत्युंजय अघोरी नृत्य, हरियाना राज्यातील पसनसुत प्रभू श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृष्य, उत्तरप्रदेश राज्यातील ३३ मुखी काली मातेचे पालखी सोहळ्यात बोलके दृष्य, विविध प्रकारचे आदिवासी नृत्य, रेलगाडा कला मंडळ कुरखेडा, जि. गडचिरोली येथील नृत्य. ढेमसा आदिवादी पारंपारिक नृत्य, ढोलशा आदिवासी पारंपारिक नृत्य, रेला आदिवासी पारंपारिक नृत्य, अश्वावर आरुढ नव दुर्गाचे बोलके दृष्य, मुलांचे शस्त्र प्रात्याक्षिके (सादरकर्ते - वीरांगणा क्रीडा ग्रुप, नागपूर) (लाठी, काठी, दानपट्टा, तलवार, भाला, नानाचाक इत्यादी), मुलींचे शस्त्र प्रात्याक्षिके ( सादरकर्ते - वीरांगण क्रीडा गुप, नागपूर) (लाठी, काठी, दानपट्टा, तलवार, भाला, नानाचाक इत्यादी), काशी येथील प्रसिद्ध गंगा आरती, उत्तरप्रदेश राज्यातील ३३ मुखी काली मातेचे पालखी सोहळ्यात बोलके दृष्य, सायं. ४ वाजता श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखी चे आयोजन शुक्रवार दि. ११ऑक्टोंबर रोजी शहरातील विविध भाषीय भजनांचा भजन कार्यक्रम,महाप्रसाद. व महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे प्रेरणास्थान युवा कीर्तनकारचैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन) नागपूर येथील म्पू चंचल आणि पवन ग्रुपच्या वतीने भक्तिमय संगीत कार्यक्रम करण्यात आले आहे, या पाच दिवसीय कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या