माविआ म्हणजे कारण सांगून अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी ! Mavia means students who fail by giving reasons!



मुनगंटीवार यांनी लगावला टोला !

चंद्रपूर (विशेष प्रति. )

कारण सांगून अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी म्हणजे महाविकास आघाडी आहे," असा टोला नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना वने, सांस्कृतिक कार्यक्रम मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'मविआ'वर लगावला. यावेळी पत्रकारांशी बोलताना  ते म्हणाले  कि,  "महायुती सरकार आणण्यासाठी ताकदीने जागा लढविता येईल, त्या संदर्भात निर्णय होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सूक्ष्म नियोजन असते. हरियानामध्ये भाजप हरत आहे असे सगळे सांगत असताना हरियाना जिंकून येत आहे. आता महायुतीचा विजय व्हावा यासाठी आम्ही विजयादशमी नंतर कामाला लागलो आहोत.

CLICK..... निष्ठावान कार्यकर्ते व नोकिया चा हॅन्डसेट भेटत बी नाही... अन् दिसत बी नाही.... !

आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे विश्लेषण आणि तयारीच्या अनुषंगाने दिल्लीत भाजपच्या बैठका होत राहतील. मात्र, महाविकास आघाडीने वाट लावण्याचे काम मध्यंतरी केले.  असा टोला लगावत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण, यावर एक मत होत नाही, त्यांच्यात प्रचंड भांडण आहे. महायुती श्रेष्ठ आहे हे सिद्ध होते. आमच्या निर्णयाशिवाय महाविकास आघाडी निर्णय घेऊ शकत नाही," अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. 

कधी होणार  निवडणूक !

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी  होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मंगळवार (दि. १५) ला दुपारी   निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली असून आज पासून आचार संहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख घोषित केली जाईल. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या