चंद्रपूर (वि. प्रति . )
विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार हे सुनिश्चित आहे. निवडणुका लढविण्याच्या आणि विजयश्री खेचून आणण्याच्या कामाला बहुतेक सर्व संभाव्य उमेदवार आपापल्या पद्धतीने लागले आहे. मतदार राजा आता ‘अती' जागृत झाला असल्याची जाणिव उमेदवारांला झाली असल्यामुळे आता जोर जास्तचं लावावा लागेल, या पुर्वकल्पनेतुन संभाव्य उमेदवारांनी तयारी सूरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील विजयभाऊ वडेट्टीवार (७३- ब्रम्हपूरी), सुधीरभाऊ मुनगंटीवार (७२ - बल्लारपूर) या महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांसोबत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्य मिळवून अपक्ष विधानसभेत पोहोचणारे ७१ - चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे किशोरभाऊ जोरगेवार हे तिन 'वार' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात राहतील, हे निश्चित आहे. यातील जोरगेवार यावेळी कुणाकडून निवडणुक लढवितात हे अनिश्चीत असले तरी किशोरभाऊ जोरगेवार हे निवडणुक लढविणार म्हणजे लढविणारचं. त्या हिशोबाने त्यांनी आपली तयारी सुरू केलेली आहे. ७० - राजूरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस मध्ये आत्ता वजनदार झालेले सुभाष धोटे हे निश्चित उमेदवार असुन त्यांच्या विरोधात भाजपचे सुदर्शन निमकर, अॅड. संजय धोटे, देवराव भोंगळे यापैकी कोण हे ठरले नसले तरी भाजप ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवारांविरोधात भाजपमध्ये या क्षेत्रात बंडखोरी होईल असे वाटत नाही. याच विधानसभा क्षेत्रात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅड. वामनराव चटप यांनी बाशिंग बांधले आहे. चटप हे अभ्यासु असुन त्यांना मानणारा मोठा वर्ग या क्षेत्रात आहे. निवडणुकीच्या रिंगणात चटप हे पुर्ण तयारीनिशी उतरणार अस्लयाचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. विदर्भाची बाजु विधानसभेत लावुन धरणारा एखादा विदर्भवादी उमेदवार असावा ती चटप यांच्या रूपाने समोर आली आहे असे सांगण्यात येत आहे. ७४ - चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये विद्यमान आमदार बंटी (किर्तीकुमार) भांगडिया हे भाजप उमेदवाराविरोधात काँग्रेसचे सतिश वारजुरकर, भाजपधुन काँग्रेसवासी झालेले धनराज मुंगले हे इच्छुक उमेदवार राहतील. मागील दहा वर्षापासुन भाजपमध्ये स्वतःची वेगळी फळी निर्माण करण्यात बंटी भांगडिया व्यस्त राहिले आहे. त्यांच्या मतदार संघात त्यांना मतदार किती साथ देईल यावर मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे. ७५- वरोरा विधानसभा क्षेत्रात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातुन हेवीवेट नेते मुनगंटीवार यांना पराभूत करून निवडुन आलेल्या काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा वेगळा गट जिल्ह्यात अस्तित्वात आला आहे. प्रतिभाताईचे दिर व स्व. बाळुभाऊ धानोरकर यांचे बंधु भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर हे वरोरा विधानसभा निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत तर दुसरीकडे काँग्रेसमधून प्रतिभा धानोरकर यांचे बंधु प्रविण काकडे यांनी या विधानसभा क्षेत्रामध्ये आपली दावेदारी केली आहे. काँग्रेसचे निष्ठावान यामुळे विचलित झाले असुन काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मागील काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांमुळे त्या वादग्रस्त तर राहिल्याचं परंतु पक्षालाही त्यामुळे नामुष्कीला सामोरे जावे लागले. आता या विधानसभेची तिकीट पक्षश्रेष्ठी कुणाला देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रमध्ये ही स्थिती जैसे थे आहे. काँग्रेसकडून संतोष रावत, डॉ. अभिलाषा गावतुरे, राजु झोडे, प्रकाश पाटील मारकवार, डॉ. दिलीप कांबळे, सुधाकर आंभोरे, महेश मेंढे, प्रविण पडवेकर, राजु झोडे सह अनेक जण इच्छुकांच्या रांगेत आहे.
Click.... आमदार होण्यासाठी इच्छुकांची गर्दी ! चर्चा मात्र जोरगेवाराच्या भुमिकेची !
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती....?
नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसचे निरीक्षक डॉ. अभिजीत वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली खास. प्रतिभा धानोरकर व आम. सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत चंद्रपूरातील इंटक सभागृहात घेण्यात आल्या. या मुलाखती फक्त 'फार्स' असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या निष्ठावानांनी प्रश्नचिन्ह उभा केला. काँग्रेस मधुन निवडणुक लढवुन आमदार होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांची रिघ लागली असुन तेवढीच काँग्रेसमध्ये बंडखोरी वरिष्ठांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
Click.... "कामाला लागा" वरिष्ठांचा इच्छुक उमेदवारांना आदेश !
चर्चा हिशोबाच्या‘त्या' 'डायरी' ची...!
लोकसभा निवडणुक निकालानंतर काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून आमदार होण्याची स्वप्ने पक्ष पदाधिकाऱ्यांना पडू लागली. त्यासाठी निष्ठा असलेल्या-नसलेल्यांची ही निष्ठा जागृत झाली व त्यांनी काँग्रेस पक्षाकडे आपल्या उमेदवारी ची इच्छा प्रगट केली. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठी अशा १५०० च्या वर इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली इच्छा प्रकट केली. पक्षश्रेष्ठींनी ही कुणाची ही नाराजी न ओढवुन घेता सगळ्यांना 'कामाला लागा !' आपल्यालाचं 'तिकीट' मिळेल असा शब्द दिल्यामुळे वातावरण निर्मीती, शक्ती प्रदर्शनासाठी, विविध सणासुदीला, विविध मान्यवरांच्या जयंत्या - पुण्यतिथी यानिमीत्ताने फ्लैक्स बॅनर लावुन शुभेच्छा देण्यास, विविध स्पर्धांना बक्षिसे देण्यास, स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यास, कार्यक्रमांला जास्तीत जास्त प्रमाणात सुरूवात केली. जुन्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरूवात केली. पक्ष आता कुणाला तरी एकालाचं उमेदवारी देईल. माझेसोबत सगळ्यांनाच उमेदवारी देण्याचा शब्द मिळाला असल्याचे कळताचं वरिष्ठांशी 'लॉबिंग'चे प्रमाणात ही वाढ झाली. जसजशी निवडणुकीची वेळ जवळ येऊ लागली तसतशी धाकधुक वाढलेल्या या संभाव्य आमदारांमध्ये आपण लावलेल्या ' ताकदी' चा डायरीमध्ये लिहुन ठेवलेला 'हिशोबाचे' आता काय करायचे ? या चिंतेने ग्रासलेल्या काहींनी ही बाब आपल्या सहकाऱ्यांसोबत शेअर करीत चिंता व्यक्त करायला सुरूवात केली असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आता चर्चा हिशोबाच्या 'त्या' 'डायरी' ची...! ही होवू लागली आहे. चर्चा हिशोबाच्या 'त्या' 'डायरी' ची...! ही डायरी येणाऱ्या वेळात कशी 'कॅश' करता येईल याची प्लानिंग ही आता होवू लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. “पब्लिक है, ये सब जानती है... ये पब्लिक है..!
0 टिप्पण्या