राज्यातील राजकारणाचा आश्वासक चेहरा...!
चंद्रपूर (वि. प्रति.) : भारत २०२८-२९ पर्यंत ५ ट्रिलियन (५००० अब्ज) अर्थव्यवस्था बनू शकतो, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) वर्तविला. महाराष्ट्र यातील १ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चे लक्ष पुर्ण करू शकतो. यासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार येणे आवश्यक आहे. भाजपच्या भरघोस विजयानंतर एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार व महाराष्ट्राचे सुसंस्कृत, अभ्यासु, विकासाचा महामेरू नाम. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आपल्या अभ्यासूपणाचा व दृरदृष्टीपणाचा त्यांनी यातुन परिचय करून दिला. त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्य-कर्तुत्वाची दखल घेऊन राज्याची मोठी जबाबदारी मुनगंटीवार यांना मिळाली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. दुसऱ्याची रेष लहान करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपली रेष मोठी केली तर समोरच्याची रेष आपोआप लहान होते, हे कृतीतून सिद्ध करणारे ते प्रतिनिधी आहे. विशेष म्हणजे विदर्भातुन सातव्यांदा विजय संपादन करणारे व चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून येणारे ते एकमेव उमेदवार आहेत. बल्लारपूर- मुल-पोंभूर्णा वासियांनी टाकलेल्या विश्वासात ते आत्तापावेतो खरे उतरले आहे. म्हणुनचं त्यांना या क्षेत्रातुन चौथ्यांदा मतदारांनी निवडून पाठविले आहे. दुसऱ्यांवर टिका करण्याचा तुच्छ डाव न खेळता यापुर्वी काय केले व आता काय करणार आहो, हे सांगत विकास कामांवर मतदारांसमोर मते मागीत त्यांनी हा विजय प्राप्त केला. मुनगंटीवार यांच्या विकास कामाचे 'मॉडेल' त्यांचाच विधानसभा क्षेत्रात नाही तर अन्य विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अशा दृरदृष्टी, अनेकदा आपल्या कृतीतुन संधीचे सोने करणाऱ्याची किमया त्यांनी दाखविली. देशात आर्थिक महासत्ता बनविण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा राहु शकतो, असे भाकित करणाऱ्या मुनगंटीवार यांनाचं ही किमया सिद्ध करण्याची स्वकर्तुत्वावर संधी अवश्य मिळेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होवू लागली आहे. नुकत्याच लागलेल्या निकालात भाजपा सगळ्यात मोठा पक्ष म्हणुन समोर आला आहे. सुधीर मुनगंटीवार हे सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठांना भावणारा एकमेव चेहरा म्हणुन समोर येत आहे, हे वेगळे सांगायला नको. भरघोस मतांनी विजयी झालेल्या मुनगंटीवार यांचे मनःपुर्वक अभिनंदन करतांना त्यांना महाराष्ट्राला सगळ्यात पुढे नेण्यासाठी पुनश्च एक मोठी संधी चालुन आली आहे, त्या संधीचे ते अवश्य सोने करतील, राज्याच्या राजकारणातील एक आश्वासक ( किमयागार) चेहरा म्हणुन त्यांच्याकडे संपूर्ण राज्य बघत आहे.
विकास कामांनी विजयश्री खेचून आणणारा 'किमयागार' !
सन २०२४ ची विधानसभा निवडणुक ही चांगल्या-चांगल्या राजकीय धुरंधरांना 'घाम' फोडणारी ठरली. लालच, प्रलोभने, आश्वासने देत निवडणुकीत पराभवांचा सामना अनेक धुरंधरांना करावा लागला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दुर्भाग्याने पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ही नव्या जोश, ताकदीने व केलेल्या विकास कामांच्या आधारावर मतदारांपाशी जावून २७ फेरीमध्ये वाढत गेलेल्या मताधिक्यानंतर २५,९८५ मतांनी जिल्ह्यातील सगळयात जास्त मताधिक्य घेवून फक्त आश्वासने देवून नाही तर कृतीतून विकास कामांनी 'विजयश्री' खेचुन आणणारे 'किमयागार' म्हणुन आज सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना संबोधले गेले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. जास्तीत जास्त सांसदीय आयुधांचा वापर करून विकास कामे खेचून आणणारा 'वाघ' विधानसभेत डरकाळी फोडण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा पाठविला आहे, त्या सर्वचं मतदारांचे मुनगंटीवार आभार मानले आहे.
Click & Read..... मंत्र्यांनी फक्त अशी मागणी केली...!
विकासकामांसाठी ‘भाऊं'ना खुले सोडा !
राज्यातील व पक्षातील अनेक मोठ्या पदांची दिलेली जबाबदारी पार पाडतांना स्थानिक प्रश्नांकडे आवर्जुन लक्ष देण्याची मुनगंटीवार यांची तऱ्हा वेगळीचं आहे. स्थानिक प्रश्नांची विल्हेवाट लावतांना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्तेयांचे ही काही कर्तव्य असते, त्याकडे दुर्लक्ष झाले तर नागरिकांच्या आक्रोशाला नेत्यांना कसे सामोरे जावे लागते, याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाला, त्यांची थोडी बहु प्रचिती विधानसभा निवडणुकींमध्ये ही दृष्टीस पडली. जे पदाधिकारी - कार्यकर्तेयांच्यावर अशी जबाबदारी देण्यात आली त्यांनी फक्त चमकोगिरी करण्यापेक्षा जबाबदारी ने पार पाडली तर 'अघटित' काही घडणार नाही, असे दोन निवडणुकांमध्ये दृष्टीपथास पडलेले वास्तव यानिमीत्ताने मांडावेसे वाटते. सुधीरभाऊंनी फक्त आणि फक्त विकास कामांवर 'फोकस' करावे अन्य कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा करावी असा फुकटचा सल्ला यानिमीत्ताने द्यावासा वाटतो. 'पक्ष' आणि 'नेते' कधी संपत / पराभुत होत नसतात त्यांना पराभुत व संपविण्यात बेजबाबदार पदाधिकारी, कार्यकर्ते कारणीभुत असतात असे जुने जाणते राजकारणी आवर्जुन सांगतात हे असेच नव्हे.
0 टिप्पण्या