वित्त व नियोजन मंत्रालयाशी संबंधित एक घटना..!
चंद्रपूर (वि. प्रति . )
नुकत्याच निवडणुका पार पडल्या, महायुतीची सत्ता बसणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. आत्ता साहजिकचं साऱ्यांचे लक्ष लागले आहे ते मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा बसणार ? कोणावर ती जबाबदारी सोपविण्यात येणार? आपल्या जिल्ह्याच्या प्रतिनिधीला कोणते खाते मिळणार याकडे... ! तिनदा चंद्रपूर येथून तर चारदा मुल येथून असे सातवेळा निवडणुक जिंकणारे व राज्याचे अभ्यासु व वजनदार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे कोणता कारभार दिला जातो, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागलेले आहे. त्यांच्याकडे आत्तापर्यंत जे पण मंत्रालय आले, त्या मंत्रालयाला त्यांनी अव्वल बनविले हे आत्तापावेतो त्यांचा कार्यकाळ बघणाऱ्यांना माहित आहे. वनमंत्रालय असो, सांस्कृतिक मंत्रालय असो की अर्थ व नियोजन मंत्रालय असो त्या खात्याला आपल्या अभ्यासु वृत्तीने अग्रस्थानी नेवून ठेवले.
Click & Read .... विकास कामांनी विजयश्री खेचून आणणारा किमयागार!
सन २०१४ मध्ये राज्यात भाजपची सरकार बनली. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे अनपेक्षितपणे वित्त मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली. एवढी मोठी जबाबदारी आपण सांभाळतांना आपल्याला जनतेच्या कल्याणासाठी थेट सहभागी होता येणार नाही, ही अडचण घेवून ते तेंव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचेकडे गेले, त्यांना अडचण सांगीतली आणि वित्त व नियोजन आपल्याकडे ठेवावे अशी सूचना केली. फडणविसांनी “अर्थमंत्रालय मला स्वतःलाचं सांभाळायचे होते. परंतु वित्त मुनगंटीवार यांना द्यावे, असे केंद्रातील नरेंद्र मोदी व अमित शहा या वरिष्ठांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगत, आपण स्वतःचं वित्त मंत्रालयासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी मुनगंटीवार यांना बोलून दाखविले.” वरिष्ठांची इच्छा म्हणुन त्यांनी राज्याच्या तिजोरीची मोठी जबाबदारी सांभाळली. सांभाळाचे होते देवेंद्र फडणविसांना व यशस्वी पणे सांभाळले सुधीर मुनगंटीवारांनी...! पहिल्यांदा राज्याच्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे दडपण ही फार होते, अतिशय दिर्घ अनुभव असणारे, कोणत्याही मंत्र्याला न दबणारे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची त्यांनी भेट घेतली. पहिल्या मिटींगमध्ये आकडे समजले, त्याचा अभ्यास केला व दुसऱ्या मिटींगमध्ये अर्थमंत्रालयाशी संबंधित महत्वपुर्ण आकडेवारी तोंडपाठ त्यांना सांगीतली. प्लॅन साईज, नॉन प्लॅन साईज, महसुली उत्पन्न, भांडवली खर्च काय ? याची आकडेवारी सांगीतली तेव्हा त्यांना ही याचे आश्चर्य वाटले. त्यांनी प्रशंसा करीत अर्थमंत्रालयाचा कारभार एका मिटींगमध्ये समजुन घेणारे ते पहिले मंत्री असल्याचे प्रशंसा केली आणि राज्याचा पाच वर्षेयशस्वी अर्थमंत्री बनता आल्याचा अनुभव त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. केंद्रातील वरिष्ठांनी अभ्यासु व अनुभवी असलेल्या मुनगंटीवारांना राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी द्यायला हवी, महाराष्ट्र राज्याचे १ ट्रिलीयन डॉलरचे लक्ष पुर्ण करून भारत २०२८-२९ पर्यंत ५ ट्रिलियन (५००० अब्ज) अर्थव्यवस्थेकडे यशस्वी वाटचाल करू शकतो, यात तिळमात्र ही शंका नाही.
0 टिप्पण्या