बल्लारपूर (वि. प्रति. ) प्रचाराच्या तोफा आता मंदावल्या आहेत. बल्हारपूर मतदार संघात कॉंग्रेस विरूध्द भाजपा अशी थेट लढत असतांनाच डॉ. अभिलाषा गावतुरे यांची "केटली" जास्तच गरम झाल्यांने बल्हारपुरात चुरस निर्माण झाली असून प्रचार भरकटला असल्याचे बघायला मिळत आहे.
वृत्त असे कि, डॉ. अभिलाषा गावतुरे या माळी समाजाच्या असल्यांचे प्रोजेक्ट करून, निवडणूकीत प्रचारात असल्यांने, सुरूवातीला भाजपाची नुकसान होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे धुवाधार प्रचारामुळे भाजपाचे कमी तर कॉंग्रेसचेच अधिक नुकसान होत असल्यांचे दिसून येत असल्यांने, बल्हारपुरातील कॉंग्रेसची लढाई आता दुसर्या क्रमांकाकरीता सुरू आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे सामाजीक व राजकीय कार्य हे फुले—शाहू—आंबेंडकर विचाराने सुरू झाले. आंबेडकरी समाजातील व मुस्लीम समाजातील अनेक कार्यकर्ते डॉ. अभिलाषा गावतुरे यांचेशी जुळले आहेत. हेच कार्यकर्ते आता डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे प्रचारात आघाडी घेतल्यांने, कॉंग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांना धोका निर्माण झाला आहे. बल्हारपुर शहरातील दलित व मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी बैठका घेवून, डॉ. अभिलाषा गावतुरे यांना समर्थन देण्यांचा निर्णय घेतल्याची माहीती आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे या जन्माने कुणबी समाजाच्या आहेत. कुणबी समाज हा कॉंग्रेस समर्थीत समाज समजला जातो. आपल्या समाजातील उमेदवार कोणत्याही पक्षाचा राहीला तरी समाज म्हणून, आपल्या समाजाच्या माणसाला निवडून द्या असे आवाहन ब्रम्हपुरीत कॉंग्रेसचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जाहीर मत व्यक्त केले होते. खासदार धानोरकर यांचे विचार बल्हारपूरातही पसरत असून, याचा मोठा फटका कॉंग्रेसचे संतोष रावत यांना बसत आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी मागीतली होती. मात्र त्यांना ती नाकारण्यात आली. त्यामुळे कॉंग्रेसचे बहुजन समर्थक आता गावतुरे यांचे बाजुने प्रचारात उतरत असल्यांने, कॉंग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांना मोठा फटका बसत आहे.
कार्यकर्त्यांचे परिश्रम खेचून आणतील उमेदवाराचा विजय...;!
भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी घेतलेली प्रचारातील आघाडीमुळे कॉंग्रेस उमेदवार तिसर्या क्रमांकावर जाईल काय अशी भिती आता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या