चंद्रपूर (वि. प्रति . )
सोमवार दि. ४ नोव्हेंबर उमेवारी अर्ज परत घेण्याचा दिवस आहे. याच दिवशी अपक्ष उमेवारांना चिन्हाचे वाटप ही होईल, त्यानंतर लढतीत कोण आहे याचे चित्र स्पष्ट होईल व उमेदवारांची रणनिती व दिशा ठरेल हे निश्चित आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यातील सहा ही विधानसभा महाआघाडी व महायुतीतील दोन्ही प्रमुख क्षामध्ये बंडखोरी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्ते-पदाधिकारी ही दुभंगल्याचे चित्र आहे. कार्यकर्ते-पदाधिकारी यांचे परिश्रम उमेदवारांकडे 'विजय'श्री खेचून आणतील यात दुमत नाही. लोकसभा निवडणुक निकालानंतर दुणावलेले काँग्रेस कार्यकर्ते - पदाधिकाऱ्यांचा उत्साह काँग्रेसमधील इच्छुकांमुळे कमी झाला आहे. तर भाजपमध्ये याउलट परिस्थिती दिसत आहे. वरिष्ठ नेत्यांच्या भुमिकेमुळे भाजप कार्यकर्ते उत्साही दिसत असले तरी काही विधानसभा क्षेत्रात बंडखोरीमुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे चित्र आहे. उमेदवारांसाठी परिश्रमाचा अभाव विशेषत्वाने जाणवत आहे.
माविआ म्हणजे कारण सांगून अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी !
७२ बल्लारपूर ballarpur विधानसभा मतदारसंघात सध्या तरी २७ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत भाजपचे संतोषसिंह रावत Rawat व भाजपचे सुधीर मुनगंटीवार mungantiwar यांच्यात होत असली तरी काँग्रेसचे बंडखोर प्रकाश पाटील मारकवार व अपक्ष डॉ. अभिलाषा गावतुरे हे उमेदवार कोणत्या पक्षाचे मत स्वतः कडे परिवर्तीत करतील, याचा अंदाज ज्या उमेदवाराला गवसला व कार्यकर्त्यानी परिश्रम केले त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल, हे निश्चीत मनले जात आहे. या मतदार संघात भाजपमध्ये बंडखोर नसल्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भुमिका स्पष्ट आहे. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढविणार आहेत तर मुनगंटीवार हे स्थानिक नसल्याचे व स्थानिक उमेदवाराला पसंती देण्याचा मुद्दा या मतदार संघात पसरविला जात आहे. १५ वर्षापुर्वीचा बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा व आजची स्थिती, या विधानसभा क्षेत्राचा बदललेला चेहरा-मोहरा मतदारांसमोर लपलेला नाही. त्यात अपक्ष उमेदवार प्रकाश पाटील मारकवार, डॉ. अभिलाषा गावतुरे, शिवसेना (उबाठा ) चे बंडखोर संदिप गिऱ्हे यांनी मतदारांशी वाढवलेला संपर्क बघता कार्यकर्ते- पदाधिकाऱ्यांचे प्रामाणिक परिश्रम या क्षेत्रातील उमेदवारांचा विजय निश्चित करतील, हे ही तेवढेच खरे आहे.
काँग्रेस उमेदवार निराशेच्या 'सावटात...!
७१ चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ऐनवेळी भाजपचे झालेले किशोर जोरगेवार jorgewar यांच्याविरोधात असलेले काँग्रेसचे प्रविण पडवेकर हा चेहरा नविन नसला तरी वजनदार उमेदवार काँग्रेसने दिला नाही अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये होवू लागली आहे. भाजपचे बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजप वरिष्ठ व किशोर जोरगेवार यांची डोकेदुखी वाढली आहे. पाझारे यांची 'समज' काढण्यात भाजप कितपत यशस्वी होते, यावर याठिकाणची लढत निश्चित होईल. प्रामाणिक कार्यकर्त्यांचे परिश्रम कुणाच्या पलड्यात राहिल, फडणविस, अजित पवार, एकनाथ शिंदे या साऱ्यांच्या सानिध्यात वावरलेले, अनुभव घेऊन आलेले जोरगेवार निवडणुकीत आपला 'अनुभव' चा लाभ कसा घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने गोंजारून ऐन वेळी धोका दिलेले राजु झाडे यांची उमेदवारी 'हलक्यात' घेणे मुर्खपणा आहे. पायदान दोन वर कुणाला ढकलयाचे ही निश्चित करणारी राजु झोडे यांची उमेदवारी आहे.
निष्ठावान कार्यकर्ते व नोकिया चा हॅन्डसेट भेटत बी नाही... अन् दिसत बी नाही.... !
सगळ्यांचे लक्ष केंद्रित करून असलेली ७० राजुरा विधानसभा क्षेत्रात यावेळी विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप chatap हे नेहमी प्रमाणे 'शेवटची' म्हणत या निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांचेपाशी प्रामाणिक कष्टकरी कार्यकर्त्यांची उणिव नाही. यावेळी चटप पुर्ण ' जोमा' ने निवडणुक लढविणार असल्यामुळे काँग्रेसचे वजनदार आमदार व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे subhash dhote यांनी चटप यांना 'हलक्यात घेतल्यास त्यांना महाग पडू शकते. आमचा विजय निश्चित आहे म्हणत रिंगणात उतरलेले भाजपचे देवराव भोंगळे यांच्या विरोधात भाजपच्याच सुदर्शन निमकर यांनी दंड ठोठावले आहे. निमकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी वरिष्ठ स्तरावर आत्तापर्यंत झालेले प्रयत्न अपयशी ठरले आहे. या दोन दिवसांत काय घडामोडी होतात, यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे.
0 टिप्पण्या