जगात एकच धर्म 'मानवता धर्म',
चंद्रपुर (वि. प्रति. )
बल्लारपूर-मुल,पोंभूर्णा-चंद्रपूर येथील ४२,१०० रुग्णांना चष्मे वाटप तर २८५० रुग्णांवर मोतीबिंदु शस्त्रक्रिया ती पण मोफत, असे ऐकले तरी आश्चर्य वाटेल, पण असे झाले आहे. सन २०१९ ते २०२४ (कोरोना काळ सोडून) पर्यंत आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा, सगळ्यात मोठा मानवता धर्म मानणारे नाम. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वरील रूग्णांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतुन गावोगावी तज्ज्ञ डॉक्टरांची चमु आणुन आरोग्यशिबीर, महाआरोग्य शिबीराचे आयोजीत करण्यात आल्याचे अनेकांनी बघितले आहे. त्याचा लाभ ही अनेकांनी घेतला आहे. त्याचीच ही वरील आश्चर्य वाटणारी आकडेवारी आहे. या व्यतिरिक्त आरोग्य शिबीराच्या माध्यमातुन जवळपास ११२ बालकांवर फोटिंस रूग्णालय, मुंबई येथे निःशुल्क हृदरोग चिकीत्सा यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या. २६ रूग्णांवर कर्करोग चिकीत्सा शिबिरांच्या माध्यमातून निःशुल्क उपचार करण्यात आले, या संकल्पनेला मुर्तरूप देण्यात बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार SUDHIR MUNGANTIWAR यांच्या पुढकाराने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्तेहे मोलाची भुमिका बजातित असतात. बरं यात ही आश्चर्य म्हणजे आपल्या संपर्कात आलेला रूग्ण हा कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या जातीचा आहे, हे न बघता 'रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा' हे ब्रिद फक्त बोलण्यातुन नाही तर प्रत्यक्ष कृतीतुन उतरविणारे सुधीर मुनगंटीवार हे १५ टक्के राजकारण व ८५ टक्के समाजकारण करणारे राजकारणी आहे. त्यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात येणारे आरोग्यशिबीरे -महाआरोग्य शिबीरे यातुन अनेक रूग्णांवर क्रिटीकल (गंभीर ) ऑपरेशन ही पार पाडण्यात आलीत.
जन्मतः हृदयाच्या आजारानेग्रस्त वंशिका चे पार पडले निःशुल्क यशस्वी ऑपरेशन !
हलाखीची परिस्थिती बल्लारपूर येथे वास्तव्यास असलेली संगीता व विशाल यांची आज साडे तिन वर्षाची असलेली वंशिका जन्मतःचं हृदयाच्या आजाराने ग्रस्त होती. ऑपरेशची करणे गरजेचचे आहे, असे डॉक्टरांनी सांगीतले परंतु परिस्थतीमुळे श्य होत नाही. त्यातचं दोन वर्षापुर्वी वडीलांचा अपघाती मृत्यू झाला. संगीतावर संकट कोसळले. दोन शिक्षण घेत असलेल्या मोठ्या मुली, हलाखीची परिस्थिती, वंशिकाचे ऑपरेशन करण्याची चिंता वेगळी..! अशा स्थिती बल्लारपूरचे भाजप पदाधिकारी आशिष देवतळे यांचेशी मागील वर्षी जुलै महिन्यात भेट झाली. संगीताने घरची परिस्थिती, मुलीचा गंभीर आजाराची आशिष ला जुलै महिन्यात माहिती कथन केली. त्यानंतर ८ जानेवारी २०२३ वंशिका हिचे मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटल येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया मोफत पार पडली. आज साडेतिन वर्षाची वंशिका हसत - कुदळत असते. फक्त एका कार्यकर्त्याला भेट दिली व महागडे ऑपरेशन पार पडले यावर आज ही संगीताचा विश्वास बसत नाही. वंशिका ला ऑपरेशन नेले, त्यावेळी संगीता च्या दोन्ही मोठ्या मुली मुंबईला सोबत होत्या, मुंबई येथे जाणे, राहणे, जेवण याचा कोणता खर्च आला नाही. एवढा परोपकारी व्यक्ती आपण जिवनात कधीही बघितला नाही. सुधीरभाऊंमुळे हे शक्य झाले, त्यांचे आपण आभारी आहोत, त्यांना एकदा प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानायची तिची इच्छा असल्याचे तिने भ्रमणध्वनीवरून सांगीतले. ही सुधीरभाऊंच्या सामाजिक कार्याची खरी पावती आहे.
मुंबईची सुरेखा मायकल लोबो (५२) यांचे मुंबई येथील रिलायन्स हॉस्पीटल मुंबई येथे वॉल रिप्लेसमेंट, चंद्रपूरचे रहिवासी ब्रिजेश रामअवतार शुक्ला (४०) यांचे हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथे मुत्राशयाचा कर्करोगावर शस्त्रक्रिया, सलोनी बुरांडे या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ११ वर्षीय बालिकेवर हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथे ब्रेन कॅन्सर ची शस्त्रक्रिया, बल्लारपूर चा राहुल धोटे योंवर होली फॅमिली हॉस्पीअल, बांद्रा मुंबई येथे हृदयविकाराची शस्त्रक्रिया अश्या जवळपास ३५ रूग्णांच्या गंभीर आजारावर अंदाजे २ कोटी १८ लाख ३० हजार रूपये खर्चाच्या शस्त्रक्रिया यशस्वी आत्तापर्यंत पार पाडण्यात आल्या आहेत. रूग्णांची नांद नोंदणी झाल्यानंतर ज्या पदाधिकारी - कार्यकर्ते - परिचित यांचेकडे रूग्णांची नोंदणी झाली त्यांचेसोबत मुनगंटीवार स्वतः संपर्कात असतात. पत्रव्यवहार, पाठपुरावा यातुन शस्त्रक्रिया होईस्तोवर सुधीरभाऊंचे लक्ष असते. रूग्णांचे कुटूंब, नातेवाईक यांचेशी संपर्क करून अडी- अडचणींची विचारपुस स्वतः मुनगंटीवार पार पाडीत असतात ही त्यांची विशेष बाब अनेकांनी या दरम्यान आठवणीने सांगीतली. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याची, पत्रव्यवहाराची प्रशंसा त्यांचा विरोध करणारे विरोधक ही खाजगीमध्ये नेहमी करीत असतात. त्यांच्या कार्य शैलीमुळे, समाजसेवी वृत्ती मुळे 'जनतेच्या सेवेसाठी यावा पुन्हा सुधीरभाऊ...!' अशी आर्त हाक मतदार करीत असेल तर विरोधकांच्या पोटात दुखण्याची काही कारण नाही.
CLICK..... माविआ म्हणजे कारण सांगून अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी !
0 टिप्पण्या