कोंबडे, बकरे, दारू, बेताल वक्तव्य या प्रचाराच्या रणधुमाळीत...! Chickens, goats, alcohol, absurd statements in the battlefield of propaganda...!



'त्या' उमेदवाराच्या सोज्वळ प्रचाराची 'धुम' !

एका आठवड्यावर येवून ठेपलेल्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जिल्ह्यात उमेदवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांने दिलेल्या बोकड - दारू पार्टीत एका सरपंचाचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. अशा दुर्देवी घटनेपासुन जिल्ह्यात उमेदवारांनी विजयासाठी नितीमत्ता गहाण ठेवून खालच्या पातळीवर येवून मतदारांना आकर्षित करण्याची आखलेली योजना, पराभवाच्या धास्तीने भांबावलेल्या एका उमेदवाराने व त्याच्या कन्येने केलेले बेताल वक्तव्य जिल्ह्यातील मतदारांसाठी नविन कटू अनुभव आहे. कार्यकर्त्यांना खुले आम शिव्यांची लाखोळी वाहण्याची घटना ही जिल्ह्यातील राजकारणांची पातळी ज्या स्तरावर आज गेलेली आहे, ती आजच्या पुर्वी कधी बघायला मिळाली नव्हती, ही बाब जिल्ह्यासाठी अतिशय गंभीर आहे. वरिष्ठांसोबतची नाराजी ही बंद खोलीत काढायची असते, सार्वजनिकरित्या त्याची वाच्यता करायची नसते, हे कळण्याइतपत येडे - बिडे जनप्रतिनिधी आपल्या अकलेचे दिवाळे निघाल्यागत वागत असल्याचे यावेळी मतदार पहिल्यांदाचं बघत आहे. सत्तेची गुर्मी व खुर्चीचा माज क्षणिक असतो, हे दाखविण्याची आता वेळ आली आहे. मतदारांना आपल्या मतदानाच्या रूपात अशा प्रतिनिधींना त्यांची जागा अवश्य दाखवतील - दाखवितलचं ... !

विजयासाठी उमेदवारांची आकडेवारी ठरली !

या सर्व गडबड गोंधळात एका उमेदवारांची सोज्वळ प्रचार मोहिम आज चर्चेचा विषय ठरत आहे. सकाळी ठरलेल्या नियोजीत दौऱ्याप्रमाणे गावात जाणे, सभा घेणे, मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधणे, आपल्या बारमाही स्वभावाप्रमाणे जास्तीत जास्त मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, अडी-अडचणी जाणुन घेणे, कोणतेही प्रक्षोभक भाषण, प्रलोभन न देता विकास कामांची माहिती देत आणखी काय विकास अपेक्षित आहे याची विचारणा करून त्याची नोंद स्वतः जवळच्या डायरीत करणे, जनतेकडून आलेल्या निवेदनाची, तक्रारीच्या कागदावर ओझरती नजर टाकुन मागे असलेल्या पि. ए. कडे तो कागद देवून पुन्हा दुसऱ्याची, तिसऱ्याच्या समस्यावर चर्चा, यात पहिला मात्र निश्चित आहे की, एवढ्या घाई-गडबडीत आपण दिलेल्या कागदावर नजर पडली म्हणजे काम फत्ते झाल्याचा विश्वास देवून जाणारा हे उमेदवार बल्लारपूर- मुल विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार होय. त्यांच्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीदरम्यान केलेल्या पाहणीमध्ये ही बाब मनाला भावुन गेली. पराभवाच्या धास्तीने भांबावुन बेताल होणाऱ्या उमेदवारांच्या घाईगर्दीत मुनगंटीवारांचा हा प्रचार मोहीम मतदारांना आकृष्ट करीत आहे. दुसऱ्याची रेष लहान करण्यापेक्षा आपली रेष मोठी करण्यात वेळ खर्ची घातल्यास समोरच्याची रेष आपोआप लहान होते, असे नेहमी मुनगंटीवार भाषणात म्हणतात, ते आज तंतोतंत खरे होतांना दिसत आहे. मुल- बल्लारपूरच्या विकासासारखा विकास हवा असे शेजारील विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराला मतदार सांगत आहे, ही भाऊच्या कार्याची खरी पावती आहे.

आरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा !

सन २००९ मध्ये बल्लारपूर विधानसभेच्या निर्मीतीनंतर पहिल्यांदा या विधानसभा क्षेत्रात 'या मातीच्या सेवेसाठी....' या प्रचार गिताच्या मोहाने मतदारांनी सुधीरभाऊंना निवडून दिले होते. त्यात ते खरे उतरले. आज पुन्हा 'या यावा सुधीरभाऊ !' हे गित त्यांच्या विकासकार्यामुळे वाजु लागले आहे. मतदार या प्रचार गिताच्या मोहात पडलेले दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या