काँग्रेस चे विजय चिमडलवार पोलिसांच्या ताब्यात ?
चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूल येथील काँग्रेस उमेदवार संतोष रावत आपल्या कारनाम्यामुळे भलतेच चर्चेत येत आहे. दोन दिवसापूर्वी कोसंबी येथे भाजपचे सुसंकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचेशी हट्टापायी करण्यावरून ते वादग्रस्त ठरले होते तर आज निवडणुकीच्या दिवशी मूल येथील काँग्रेस भवन येथे मतदारांना पैसे व दारू वाटप करण्यावरून पुन्हा ते वादाच्या भोवर्यात सापडले आहे.
राडा संस्कृतीमुळे रावतची पराभवाकडे वाटचाल?
सविस्तर वृत्त असे कि, मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार असल्याने पोलिसांनी धाड मारल्याची माहिती आहे.
पोलीसानी स्थानबद्ध केलेले विजय चिमड्यालवार Vuhat Chimdyalwar हे महिलांना काँग्रेस भवन येथे बोलावून दारू आणि पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांसह सपना मुनगंटीवार आणि शलाका मुनगंटीवार MUNGANTIWAR यांनीही काँग्रेस भावनात जाण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून स्थानबद्ध केलेले विजय चिमडलवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे गांधी चौकात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
0 टिप्पण्या