रतन टाटांनी केली होती मुनगंटीवारांची प्रशंसा ! Ratan Tata praised Mungantivar!



नाम. गडकरी gadkari यांनी कथन केला प्रसंग... !

दुर्गापुर (वि. प्रति . )

प्रत्येक क्षेत्रात सुधीरभाऊंनी अत्यंत चांगले काम केले आहे. स्व. रतन टाटांचा ratan tata अलीकडेच मृत्यू झाला. पण ते हयातीत असताना एकदा मला भेटले आणि सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांच्याविषयी बोलतांना ते म्हणाले की, चंद्रपूरला चांगले इंजिनियरिंग कॉलेज झाले पाहिजे आणि सर्वसुविधायुक्त असे कॅन्सर हॉस्पिटल झाले पाहिजे, यासाठी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. आणि त्यांना आमचे ट्रस्ट सहकार्य करणार असल्याचे रतन टाटांनी यावेळी सांगीतले, त्यावेळी आपल्याला खुप आनंद झाला असल्याचे ही नाम. यांनी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे आज बुधवार दि. १३ रोजी ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ना. श्री. गडकरी gadakari बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, सुधीरभाऊंनी जिल्ह्यामध्ये उत्तम बगिचे केले, खेळाची मैदाने केली, उद्योग आणले. ताडोबाला आंतरराष्ट्रीय नकाशावर महत्व प्राप्त करून देण्याचे काम मुनगंटीवार यांनी केले आहे. आपल्या भागाच्या विकासासाठी आवश्यक असलेली प्रत्येक योजना, प्रत्येक उपक्रम त्यांनी राबविला. आपण ४० वर्षांपासून चंद्रपूरला येतोय. गेल्या काळात चंद्रपूर पूर्णपणे बदलले आहे. 'सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून जागतिक विक्रम केला. ५० कोटी झाडे लावणारा, पर्यावरणासाठी मोठे योगदान देणारा देशातील पहिल्या क्रमांकाचा नेता म्हणून सुधीरभाऊंचा उल्लेख होतो. रस्त्याच्या बाजुला झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करण्यासाठी मी आमच्या अधिकाऱ्यांनाही सुधीभाऊंकडे पाठवले आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले.' २०१४ पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. मात्र गेल्या दहा वर्षांत ४७४ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग नव्याने निर्माण झाले. याचे श्रेय सुधीरभाऊंनाच आहे. आता सुधीरभाऊंच्याच प्रयत्नांमुळे समृद्धी महामार्गालाही चंद्रपूरशी जोडले जाणार असल्याचे ना. श्री. गडकरी यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. सुधीरभाऊ चंद्रपूरचे भविष्य बदलवणारा नेता आहे. सुधीरभाऊंनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण क्षेत्रात काम करतांना पायाभूत सुविधा विकसित केल्या. महाराष्ट्रात सर्वांत चांगले काम करणाऱ्या पहिल्या पाच आमदारांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल अशी प्रशंसा त्यांनी यावेळी मुनगंटीवार यांची केली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील प्रगतीशील जिल्हा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना समर्थन द्या, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले.

CLICK.... आरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या