विजयासाठी उमेदवारांची आकडेवारी ठरली ! The statistics of the candidates for victory have been determined!



कार्यकर्त्यांचे प्रामाणिक परिश्रम ठरवेल विजयी उमेदवाराचे "मताधिक्य!"

२० नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा ही विधानसभा क्षेत्रात उमेदवार आता स्पष्ट झाले असुन प्रचाराला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिहेरी लढत होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. विजयासाठी लागणाऱ्या मतदानांचा अंदाज उमेदवारांनी घेवून ते प्रचाराला लागल्याचे दिसत आहे. सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये ३ लाखाचा जवळपास मतदार आहेत. ८० हजार मताचा आकडा पार गाठणारा उमेदवार विजयाची माळ आपल्या गळ्यात खेचून घेणार हे निश्चित ! अस्थिर दोलायमान कार्यकर्ते  उमेदवाराचे दारात जात असून मतदारांनी आपला उमेदवार मात्र निश्चित केल्यामुळे  कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्नांतुन खेचून आणलेले ते उमेदवाराचे  मताधिक्य राहील, लढतीतील उमेदवारांपाशी आपल्या विजयाचे मतदान आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

कार्यकर्त्यांचे परिश्रम खेचून आणतील उमेदवाराचा 'विजय...'!


७०- राजूरा विधानसभेत एकंदर पुरुष १ असे एकंदर १६४५७७, स्त्री १५११२३, इतर ३१५७०१मतदार आहेत. या मतदार संघात कष्टकरी कार्यकर्त्यांचा भरणा असलेले अॅड. वामनराव चटप यांच्या उमेदवारीने काँग्रेस पक्षाचे सुभाष धोटे व भाजपचे देवराव भोंगळे यांना आवाहन उभे केले यात शंका नाही. या क्षेत्रात भाजप मध्ये झालेली बंडखोरी थंडावल्यानंतर नाराज ॲड. सुभाष धोटे व सुदर्शन निमकर कोणासोबत आहेत ? याबाबत शंका निर्माण होत आहे.

७१ - चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात पुरुष ९८४९१९, स्त्री १७८०१२, इतर ३५ असे एकंदर ३६२१६६ मतदार आहेत. ऐन वेळी भाजपमध्ये आलेले किशोर जोरगेवार, अस्तित्वहीन व नेतृत्वहीन चेहरा म्हणुन काँग्रेसचे प्रविण पडवेकर यांचेबद्दल बोलले जात आहे. शेवटपर्यंत आशेवर ठेवण्यात आलेले काँग्रेसचे असंतुष्ट राजु झोडे यांची उमेदवारी विजयी उमेदवाराचे भाग्य निश्चित करणारी ठरू शकते. भाजपचे बंडखोर ब्रिजभूषण पाझारे अतिरिक्त प्रभाव टाकु शकेल असे वाटत नाही. राजु झोडे मतदानांची विभाजन करणारे उमेदवार या क्षेत्रात ठरणार आहे.

सगळ्यांचेच लक्ष लागुन असलेले ७२ - बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पुरुष १५५२०३, स्त्री १४८५१२ इतर ३ असे एकंदर ३०३७१८ मतदार आहेत. राज्याचे वजनदार मंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांचेविरोधात विजय वडेट्टीवार गटाचे संतोष रावत हे काँग्रेसचे तर काँग्रेसने 'कामाला लागा' असा शब्द देवून वेळेवर आपल्या धोरणाप्रमाणे ऐन वेळी पाठ दाखविलेल्या अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या उमेदवारी मुळे या क्षेत्रात सुज्ञ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसवासी झालेल्या अभिलाषा गावतुरे यांना काँग्रेस वरिष्ठांकडून उमेदवारी परत घेण्यासाठी कुणीही सांगीतले नाही त्यामुळे काँग्रेस उमेदवाराला 'बॅकफुट' वर आणण्यासाठीचा चेहरा असे आता त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये चर्चा आहे. सोमवार पासुन रविवारपर्यंत नेहमी जनसंपर्कामध्ये राहणारे, बल्लारपूर- मुल-पोंभूर्णा चा कायापालट करणारे तिन खेपेपासुन या क्षेत्राचे प्रतिनिधी राहिलेले सुधीर मुनगंटीवार यांची लढत कुणाशी राहिल याबाबत अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ज्यांचे कार्यकर्ते प्रामाणिक विजय त्यांच्याच आहे, हे पक्का आहे. लोकसभेत केलेली चूक त्यातून अल्पकाळात दिसत असलेले परिणाम याचा जनता आता पाढा वाचू लागली आहे. पुन्हा पुन्हा चूक करणार नाही.

आरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा !

मूल-बल्लारपूर-पोंभुर्णा या परिसराचा १५ वर्षात  बदललेला चेहरा-मोहरा, रंगरूप, विकासाचे मॉडेल आहे. या क्षेत्राचे मतदार हि गोष्ट आवर्जून बघत आणि सांगत आहे. विरोधकांकडे आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरा मुद्दा नसल्याने त्यांच्या प्रचारामुळे कंटाळलेले दिसत आहे. कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न मुनगंटीवारांचे मताधिक्य  वाढवतील यात  दुमत नाही. 

माविआ म्हणजे कारण सांगून अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या