जगाच्या पोशिंद्याचा पाठीराखा सुधीरभाऊ ! Sudhir Bhau, the supporter of the world's clothes!



चंद्रपूर : महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात ५० कोटी वृक्षारोपणाच्या महत्वाकांक्षी उपक्रमातून छाप सोडणारे भाजपाचे वजनदार नेते सुधीर मुनगंटीवार वलयांकित नेतृत्व आहे. मागील १० वर्षांपासून राज्याचे वनखाते समर्थपणे सांभाळत असताना या खात्याची ओळख सर्वत्र करून दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील tadoba andhari ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न सर्वांनी जवळून बघितले आहे. काही वर्षांपूर्वी ताडोबात येणारे बोटावर मोजण्याइतके पर्यटक आज लाखोंच्या संख्येत पाहोचले आहे. पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येमुळे ताडोबाच्या सभोवताल असलेल्या गावांचा शाश्वत विकास व्हायला लागला आहे. नव्हे, शेकडो तरूणांना रोजगाराचे दालन उघडण्यात sudhirbhau सुधीरभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. सुधीरभाऊंनी वनखात्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पासोबतच जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजासाठीही नाविण्यपूर्ण योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर काही कोटी रूपयांत दरवर्षी मिळणारा पीकविमा सुधीरभाऊंच्या प्रयत्नाने २०० कोटींच्या वर पोहोचला आहे. यासाठी संबंधित विमा कंपनीशी भाऊंनी दोन हात करून शेतकऱ्यांच्या पदरात विम्याची रक्कम पाडल्याचा अनुभव जिल्ह्यातील नागरिकांनी उघड्या  डोळ्यांनी बघितला आहे. गतवर्षी ओल्या दुष्काळामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पीक मातीमोल झाले होते. मात्र, संबंधित पीकविमा कंपनीकडून पंचनामे व मदत देण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र, सुधीरभाऊंनी हा विषय अजेंड्यावर घेत कंपनीच्या अधिकाऱ्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतरही कंपनीकडून टाळाटाळ केली जात असताना आपल्या वेगळ्या शैलीने कंपनीला वठणीवर आणून काही कोटीत मिळणारा पीकविमा शेकडो कोटींच्या घरात पोहोचला आहे. कदाचित महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्याला मिळणारी पीकविम्याची रक्कम आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक असून सुधीरभाऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरे पाठीराखे ठरले आहेत.

click & read .......... आरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा !

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनातही सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीचा दबदबा आहे. मुंबईच्या मंत्रालयात अनेक विषयांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरत अनेक योजना चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही त्यांनी आणल्या आहेत.  गेल्या १० वर्षात वनमंत्री forest minister  म्हणून काम करताना जंगलव्याप्त गावातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून काय करता येईल, यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या कल्पकतेतून  सोलर कुंपन व काही महिन्यांपूर्वीच राबविण्यात आलेला वन्यप्राणी गावाच्या सीमेत येत असताना वाजणारा सायरन , हा प्रयोग अनेकांचे जीव वाचविणारा ठरत आहे. चिचपल्लीसारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी पाठबळ मिळावे यासाठी संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय सुधीरभाऊंनीच घेतला आहे. वरोरासारख्या ठिकाणी भाजीपाला संशोधन केंद्रही लवकरच उभे राहणार आहे. गोसेखुर्दचे धरणाचे पाणी जिल्ह्यातील काही तालुक्यात आणण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सार्थकी ठरले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावणार आहे.  राज्याचे वनमंत्री म्हणून काम करताना जंगल आणि शेती अशी सांगड कशी घालता येईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच बांबू शेतीचा प्रयोग जिल्ह्यात राबविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. पारंपरिक पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हाती काहीच उरत नाही. त्यामुळे शेतकरी सुखी, समृद्ध व्हावा, ही सुधीरभाऊंची संकल्पना भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा  कायापालट करणारी ठरणार आहे. बांबू शेती कशी फायदेशीर आहे, यासाठी वनविभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रवृत्त केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठा भाग जंगलव्याप्त असल्याने प्राण्यांचा मोठा उपद्रव सुरू असतो. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सोलर कुंपन ही योजना राबविली. मात्र, या संकटातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी बांबू शेती हा प्रयोग भविष्यात  शेतीक्षेत्र व शेतकऱ्यांचे भाग्य उजाळणारा ठरण्याची शक्यता आहे.


वन आणि शेतीक्षेत्रासह इतर क्षेत्रातही सुधीरभाऊंनी आपल्या कतृर्त्वाचा ठसा उमटविला आहे. चंद्रपुरात वन अकादमीची मोठी वास्तू त्यांच्या पुढाकारातून उभी झाली आहे. विसापूरची सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, ठिकठिकाणी बगीचे, पार्क, एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र याप्रकारचे मोठे प्राजेक्ट त्यांच्या कल्पकतेतून नावारूपास आले आहे. या प्रकल्पांमुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे.  टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पीटलही चंद्रपुरात उभे राहात आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनेक महत्वाचे प्रकल्प त्यांनी हाती घेतले असून भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीउद्योग भरभराटीस येईल, यात कोणतेही दुमत नाही. मागील काही वर्षापर्यंत शेतकऱ्यांनी पीकविमा काढल्यानंतर विमा कंपनीकडून मिळालेल्या मोबदल्यावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत होते. ती मदत तुटपुंजी राहात होती. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना सुधीरभाऊंनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत पीकविम्याचा विषय हाती घेतला. याबाबतची वास्तविकता जवळून बघितल्यानंतर शेतकऱ्यांची केवळ बोळवण केली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शतेकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार मोबदला मिळवून  देण्याचा निर्धार केला. यासाठी वारंवार पीकविमा कंपनी व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतरही पीकविमा कंपनीकडून नुकसानीप्रमाणे मदत देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर कठोर भाषत सुधीभाऊंनी दम दिल्यानंतर पीकविमा कंपनी वठणीवर आली व शेतकऱ्यांना कधी नव्हे एवढी रक्कम यंदा मिळाली. सुधीरभाऊंनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे हजारो शेतकऱ्यांना कितीतरी पटीने जास्त मोबदला मिळाला आहे.  गेल्या काही वर्षांपूर्वी रानडुकरांबाबतचा निर्णय सुधीरभाऊंनी घेतला  होता. त्या निर्णयामुळेही शेकडो शेतकऱ्यांना आपले पीक वाचविण्यासाठी मदत झाली. अशाप्रकारचे बळीराजासाठी अनेक निर्णय सुधीरभाऊंनी घेतले असून, शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने पाठीराखे झाले आहेत.

-एक जागरूक पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या