सुधीर मुनगंटीवार यांची विजयाकडे आगेकुच ...! Sudhir Mungantiwar's march towards victory...!



विकासाचा नवा अध्याय सुरु !

बल्लारपूर (प्रति . )

आज सकाळी विधानसभा निवडणुकीचा निकालाला प्रारंभ झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ७२ - बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्राकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. या विधानसभा क्षेत्रात राज्याचे मंत्री चंद्रपूर गौरव, ज्ञानयोगी, अभ्यासु मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा आपल्या भाग्य आजमावित आहेत.  वृत्त लिहीस्तोवर २७ मधुन  २७ मधुन ४ फेऱ्या पार पडल्या, यात पहिल्या फेरीत मुनगंटीवार यांना ४५७५ तर काँग्रेसचे संतोष रावत यांना ३३७० मते घेवून त्यांनी १२०५ मतांची आघाडी मिळविली होती, तर नुकत्याच आलेल्या दुसऱ्या फेरीत ८७३० मते घेवून मुनगंटीवार यांनी २१६७ मतांची आघाडी मिळविली आहे.  तिसऱ्या फेरीत ११२४४ मते मिळवीत त्यांनी  २१३३ तर  चवथ्या फेरीत १२,९३५ मते घेत त्यांनी २४५० मतांची आघाडी मिळविली आहे.

click & read ....... मूल येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांच्या स्मारकासाठी...!

महत्वाची म्हणजे आत्तापर्यंत मुनगंटीवार यांनी लढविलेल्या सात निवडणुकीमधील अत्यंत महत्वाची निवडणुक समजली जात होती. यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे काँग्रेस चा आत्मविश्वास दृढ होवून या निवडणुकीत काँग्रेस काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांनी कोसंबी गावामध्ये केलेले घृणित कृत्य त्यांच्या वृत्तीचे दर्शन घडविणारे होते. पहिल्यांदाच मुनगंटीवार यांच्यासारख्या सुसंस्कृत उमेदवारावर चालुन जाण्याचे घडलेले कृत्य अत्यंत खालच्या पातळीचे होते, त्याचप्रमाणे मुल काँग्रेस भवन येथे मतदारांना होणारा पैशाचा व दारुचा पुरवठा या विधानसभा क्षेत्रात काँग्रेस ची पातळी दाखविणारा होता, तो मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे दिसत चित्र ईव्हीएम मधून दिसत आहे. 'शेर अभी जिंदा है' हे विजयाकडे वाटचाल करणाऱ्या मुनगंटीवार यांनी दाखवुन दिले. तसेच यापुर्वी काय केले आणि आत्ता काय करणार ! असे सांगत व आपला सुसंस्कृतपणा कायम ठेवत विकास कामांचा दाखला देत ते मतदारांसमोर गेले, आणि मतदारांनी त्यांना दाखविलेले पसंती, त्यांना भविष्यामध्ये आणखी चांगले करण्याची प्रेरणा देणारी राहिल, हे मात्र निश्चित... !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या