अंदाजापुढे एकाचा धक्कादायक लागेल निकाल... !
चंद्रपूर (वि. प्रति . )
कल्याण, कुबेर, मुंबई मटका असे अनेक सट्टा प्रकार रोज खेळले जात असल्याचे बोलल्या जात असते. या व्यतिरिक्त ही क्रिकेट सामने व अन्य ठिकाणी ही या सटोरियांनी 'पैसे लगाव, पैसे कमाव !' या धोरणाला जागत निवडणुकीवर ही मोठ्या रकमेची लगावडी - पिछवडी या सटोरियाकडून होत असल्याचे बोलले जाते. रंगीले - रतन निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांवर आपले पैसे कमाविण्याचे भाग्य आजमावित असतात. या पुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही सट्टेबाजी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाली होती. एकदाचा एक्झीट पोल चा अंदाज खोटा ठरेल परंतु या सटोरियांचा नाही, असे शौकीन सांगतात. नुकतीच २० नोव्हेंबर ला महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणुक पार पडली, उद्या शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल आहे. परंतु सटोरियाने जिल्ह्यातील हा बाजार मोठ्या प्रमाणावर गरम केल्याचे दिसत आहे.
ज्या उमेदवाराचा दर कमी त्याच्या विजयाचे संकेत जास्त असे हे गणित असल्याचे खेळणारे सांगतात. चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्राचे उमेदवारांचे गणिताची चर्चा आज चंद्रपूर जिल्ह्यात रंगली आहे. हाती आलेल्या सूत्रानुसार यात ब्रम्हपुरी विधानसभा २ रू. ७५ पैसे बिजेपी तर काँग्रेस १५ पैसे, चिमुर मध्ये काँग्रेस ४० पैसे बिजेपी ७० पैसे, वरोरा विधानसभा बिजेपी ३० पैसे, काँग्रेस १.६० पैसे, अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे १ रू. ५० पैसे, तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्र बिजेपी ४० पैसे काँग्रेस १.५० पैसे अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे ३ रूपये, चंद्रपूर बिजेपी १५ पैसे, काँग्रेस २.५० पैसे तर भाजपचे बंडखोर अपक्ष ब्रिजभुषण पाझारे ६ रूपये, तर महत्वाची लढत असलेली राजुरा विधानसभा ही बिजेपी २ रू. ३० पैसे काँग्रेस ८० पैसे शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप ८० पैसे असा दर सध्या मार्केटमध्ये सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही विश्वास दर्शवित नाही किंवा असल्या सट्टेबाजीचे आम्ही समर्थन ही करीत नाही. परंतु सुरू असलेल्या चर्चेचे हा वृत्तांत, इच्छुक वाचकांसाठी...!
७१-चंद्रपूर विधानसभा क्षेत्र या ठिकाणी ऐनवेळी भाजपवासी झालेले किशोर जोरगेवार यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रविण पडवेकर यांची सरळ लढत होत आहे. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार ब्रिजभूषण पाझारे व अपक्ष उमेदवार राजु झोडे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही उमेदवारांना आपली म्हणावी तशी किमया दाखविण्यात न आल्याने या क्षेत्राचा निकाल हा धक्कादायक लागेल अशी चर्चा ही जनतेत सुरू आहे.
0 टिप्पण्या