उद्या बुधवार २० नोव्हेंबर ला महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहे. हजारो उमेदवार नागरिकांची सेवा करण्यासाठी या निवडणुकांत आपले भाग्य आजमवित आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभांमध्ये १२० उमेदवार रिंगणात आहेत. आपले अमुल्य मत देतांना आपल्याला विचार करायचा तो फक्त आपल्या भविष्याचा..!
ज्या उमेदवारांपाशी आपल्या भविष्याचे व्हिजन आहे, असा उमेदवाराला आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे. जिल्ह्यात १२० उमेदवारांमध्ये ७२-बल्लारपूर विधानसभा मतदार क्षेत्रात तिसऱ्यांदा रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे सगळ्यात उच्च शिक्षीत उमेदवार असुन ते सातव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी (चारदा चंद्रपूर व तिस्रयांदा बल्लारपूर) मतदारांकडे साकडे घालत आहेत. विधानसभेत संपूर्ण सांसदीय आयुधांचा वापर करून आपल्या विधानसभा क्षेत्रात कार्य खेचून आणणारे ते महाराष्ट्रातील एकमेव प्रतिनिधी आहेत. त्यांनी आत्तापावेतो केलेले कार्य हे त्यांच्या दूरदृष्टीचा - अभ्यासु वृत्तीचा परिचय करून देणारे आहे.
बल्लारपूरातील विसापूर येथे दोन वर्षापुर्वी एसएनडीटी महाविद्यालय सुरू करण्यात आले. शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वेयांनी महिलांनी शिक्षणात आघाडी घ्यावी यासाठी देशात पहिल्यांदा एसएनडीटी विद्यापीठाची सुरूवात केली. संपूर्ण देशात एसएनडीटीच्या विद्यापीठाच्या ६० पेक्षा जास्त शाखा आहेत. या विद्यापीठाचा शिक्षणाचा लाभ आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थीनींना मिळावा यासाठी त्यांनी हे विद्यालय बल्लारपूरात खेचून आणले.
बल्लारपूर येथे सुरू असलेले सैनिक स्कुल ही त्याच भावनेने त्यांनी आपल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात आणलेली एक उपलब्धी आहे.
click.... मूल येथील कर्मवीर दादासाहेब कन्नमवारांच्या स्मारकासाठी....!
लुप्त होत चाललेल्या वनौषधींच्या प्रजातींची पुर्ननिर्मीती करावी, त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा त्याचे संगोपन व्हावे या दिव्य दृष्टीने प्रेरित होवून त्यांनी बल्लारपूर येथे बोटॅनिकल गार्डन ची स्वप्नपुर्ती केली.
चंद्रपूरात उभी असलेली वन अकादमी हे ही त्यांच्या दिव्यदृष्टीची प्रचिती आणणारी शिक्षण संस्था आहे. चंद्रपूर-गडचिरोली हा वनव्याप्त जिल्हा आहे. वन विभागाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे या दृष्टीने उभी राहिलेली ही अकादमी आज जिल्ह्याचे नांव देशात अग्रस्थानावर नेत आहे.
असे एक ना अनेक प्रकल्प त्यांनी जिल्ह्यात आणले आहे. येणाऱ्या काळातील पिढीला स्वतःचे स्वप्न पुर्ण करता यावे यासाठी त्यांनी विविध प्रकल्पांना महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर-बल्लारपूर येथे आणण्यात खारीचा वाटा उचलला आहे, तो आज मतदारांपासून लपुन राहिलेला नाही. तारांकित - अतारांकित प्रश्न, शासकीय - अशासकीय विधेयके, अर्धा तास चर्चा आदि शासकीय आयुधांचा संपूर्ण वापर करीत त्यांनी अनेक कामे जिल्ह्यात खेचून आणली आहेत.
भविष्याचा विचार करणारे अभ्यासु प्रतिनिधी म्हणुन त्यांच्याकडे देशात - राज्यात बघितले जाते, अशा अभ्यासु, सुसंस्कृत उमेदवाराला मतदार अवश्य आपली पहिली पसंती देतील व 'आपले अमुल्य मत फक्त आणि फक्त भविष्याला....!' अशी सार्थ अपेक्षा !!
0 टिप्पण्या