चंद्रपूर (का. प्र.)
राज्य सरकारने नव्या वर्षातील शासकीय सुट्ट्यांची घोषणा केली आहे. नुसार यंदा प्रथमच भाऊबीजेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, या निर्णयामागे विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या 'लाडकी बहीण' योजनेचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याची चर्चा रंगली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींचा बराच बोलबाला राहिला. त्याच पार्श्वभूमीवर नव्या सुट्टीबाबत चर्चा होत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये २०२४ साल निरोप घेत आहे. येणाऱ्या नव्या वर्षात शासकीय सुट्ट्या किती असणार, याबाबत देखील उत्सुकता लागली होती.
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल नाही
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून २०२५ मधील शासकीय सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात भाऊबीजेची सुट्टी वाढवण्यात आल्याने आता शासकीय सुट्ट्यांची संख्या २५ वर पोहोचली आहे. राज्य सरकारने पहिल्यांदा जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये भाऊबीजेच्या सुट्टीचा समावेश नव्हता. मात्र त्यानंतर पुन्हा पत्रक काढून तिचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेतील महिला कर्मचारीही सरकारच्या 'लाडक्या' असल्याचे अप्रत्यक्ष अधोरेखित करीत हा निर्णय अशी घेतला असावा, चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.
२०२५ च्या शासकीय सुट्ट्या
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २६ फेब्रुवारी महाशिवरात्री, १४ मार्च होळी (धुलिवंदन), ३० मार्च गुढीपाडवा, ३१ मार्च रमझान ईद, ६ एप्रिल रामनवमी, १० एप्रिल महावीर जन्मकल्याण, १४ एप्रिल डॉ. आंबेडकर जयंती, १८ एप्रिल गुड फ्रायडे, १. मे महाराष्ट्र दिन, १२ मे बुद्ध पौर्णिमा, ७ जून बकरी ईद, ६ जुलै मोहरम, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट पारशी नववर्ष दिन, २७ ऑगस्ट गणेश चतुर्थी, ५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, २ ऑक्टोबर दसरा, २१ ऑक्टोबर लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर दिवाळी (बलिप्रतिपदा), २३ ऑक्टोबर भाऊबीज, ५ नोव्हेंबर गुरुनानक जयंती, २५ डिसेम्बर ख्रिसमस
0 टिप्पण्या