चंद्रपूर (का. प्र.)
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमाकडुन रील्स, व्हीडीओदावरे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असुन याबाबत वेगवेगळया स्तरावरुन या कार्यालयाकडे विचारणा होत आहे.
या "लाडक्या बहिणी" होणार अपात्र !
या अनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी, पुणे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना,प्रकल्प सर्व, जि. पुणे. यांनी पात्र क्र. ( जा.क्र. पि. एबाविसेयो /कार्या-2/422/24) नुसार १० डिसेम्बर २०२४ रोजी काढलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्ती मध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास कळविण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये या करिता आपण आपले स्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणुन दयावी, अशी माहिती देण्यात अली आहे.
0 टिप्पण्या