मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळांत 'डच्चु' म्हणजे 'कटप्पा' ने 'बाहुबली' कों क्यों मारा ? सारखे सस्पेन्स...! Why did Mungantiwar get 'Baahubali' killed by 'Dachchu' i.e. 'Katappa' in the cabinet? Suspense like...!



मुंबई (वि. प्रति . )

नुकतीच देवाभाऊ टिम च्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, त्यात सात वेळा निवडुन आलेले आणि राज्यात महत्वाची पदे भुषवित त्यांना उंचावणारे बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही, हा चंद्रपूर जिल्ह्यावर फार मोठा अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया आता चंद्रपूरवासियांकडून व्यक्त होवू लागल्या आहे. ही बाब म्हणजे जिल्ह्याचा विकास खुंटवणारी आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा आता बाहेरून आयात करावा लागणार ही गोष्ट चंद्रपूर वासियांना मात्र 'पचनी' पडण्यासारखी नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद, राज्याचे वित्त-नियोजन, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री पदे यासारखी राज्याची मोठी पदे त्यांनी भुषविली व त्याला न्याय दिला. संधीचे सोने करण्यात 'सुधीरभाऊ' नेहमी यशस्वी राहिले व पदाला न्याय देण्यात मुनगंटीवार नेहमी अग्रस्थानी राहिले, हीच बाब त्यांचे पक्षातंर्गत विरोधकांना नेहमी बोचणारी राहिली.  मुनगंटीवार यांनी अर्थ मंत्रालयातील केलेल्या कार्यामुळे त्यावेळचे केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एक्सलंस मिनीस्टर हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता, ही महाराष्ट्रासाठी गौरवशाली बाब आहे. अनेक संस्था, संघटनानी त्यांना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. त्याचप्रमाणे राज्याचे वन मंत्रालय हे कमी लेखले जाणारे खाते ही मुनगंटीवार mungantiwar यांचेकडे आल्यानंतर त्यांनी राज्याच्या वनमंत्रालयाला साता समुद्रापार त्याची ख्याती केली तीच स्थिती सांस्कृतिक मंत्रालयाची आहे. 'गर्जा महाराष्ट्र माझा' याला राज्यगीताचा दर्जा ही मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री असतांना देऊन या खात्याची गरिमा मोठी केली. या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू मंत्रीमंडळाचा विस्तार करतांना कश्या काय विसरल्या गेल्या, ही संशोधनाची बाब आहे. अभ्यासु, दुरदृष्टी, जे बोलतो ते करतो,  अखंड पत्रव्यवहार, सातत्याने विकास कामे खेचून आणणारा प्रतिनिधी अशी त्यांची ख्याती व स्वभाव आहे. मग त्यांना मंत्रीमंडळातुन देण्यात आलेला 'डच्चु' आकस भावनेतुन की अन्य कटकारस्थानाचा भाग आहे ? याची चर्चा आता चंद्रपूर जिल्ह्यासोबतचं प्रादेशिक मिडीयामध्ये मोठ्या स्तरावर चर्चिल्या जात आहे.

राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार हा केंद्रातुन होणार असल्याचे अनेकदा प्रसार माध्यमांसमोर सांगण्यात आले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या आमदारांना मंत्रीपद देण्यात आले त्या सर्वच आमदारांना वेळेवर फोन करून सांगण्याची सावधगिरी बाळगत नुतन मंत्री व त्यांच्या परिवाराला विशेष चार्टेड विमान पाठवुन शपथविधीसाठी बोलाविण्याची सावधगिरी राज्य सरकारने यावेळी राज्य सरकारने पहिल्यांदाच बाळगली. मंत्रीमंडळाच्या विस्तारात मुनगंटीवार यांना स्थान दिले नाही याची ही तेवढीच गोपनीयता कसोशीने बाळगण्यात आली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणविस मंत्रीमंडळात मुनगंटीवार यांना डावलण्यात येईल याची कुजबुज चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या दुसऱ्या कटकारस्थानी गोटात पूर्वीपासून सुरू होती. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी मंत्री मंडळ विस्तारानंतर घेतलेल्या पत्र परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना ज्यांना डावलण्यात ज्यांचे 'परफार्मेन्स' निराशाजनक राहिले असेल किंवा वरिष्ठ स्तरावर पक्ष डावलेल्याना दुसरी जबाबदारी देणार त्यामुळे ते वगळण्यात आल्याचे सुतोवाच केले. मोठे बहुमत असलेला भाजप आज राज्यात सत्तास्थानी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या ६ पैकी ५ जागांवर भाजपचे आमदार निवडुन आले आहेत आणि जिल्ह्यात एक सुद्धा मंत्री पद देण्याचे औचित्य न बाळगणे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला बाधा निर्माण करणारी ठरू शकते, चंद्रपुर जिल्ह्यांवर अन्याय करणारी आहे, अशी प्रतिक्रिया आता मतदारांमध्ये व्यक्त होवू लागली आहे. मुनगंटीवार यांच्या रूपाने फडणविस सरकारमध्ये जिल्ह्याला एकतरी मंत्री पद मिळेल, अशी आशा जिल्हावासियांना होती, परंतु ऐन वेळी ती पण धुळीस मिळविली, केंद्रामधुन मुनगंटीवार यांच्या नावाला नापसंती होती की राज्यामधून कटकारस्थान शिजले, हे कळायला मार्ग नाही. अखेर.... ‘कटप्पा' ने 'बाहुबली' को क्यों मारा ? या बाहुबली चित्रपटातील सस्पेन्ससारखे आहे. यात कटप्पा कोण ? याची ही चर्चा आता मतदारांमध्ये होवू लागली आहे. विरोधकांची निंदा नालस्ती टाळून विकास कामावर मते मागून विजय पदरात पडून घेणारे मुनगंटीवार हे राज्यातील बहुतेक एकमेव लोकप्रतिनिधी असतील. 

पावला-पावलावर मनाविरोधात घडत असतांना ही काम करतो तो कार्यकर्ता...!' या उक्तीप्रमाणे मुनगंटीवार यांनी ‘मौनम् सर्वार्थ साधनम्' यांनी पक्ष श्रेष्ठी जो आदेश देईल त्यावर कार्य करण्याचा निर्धार माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. आपली रेष मोठी केली तर दुसऱ्याची रेष आपोआप लहान होते या तत्वाला मानणारे मुनगंटीवार या क्षणाचे हि सोने करतील, याचा त्यांचा चाहत्यांना या क्षणीही पूर्ण विश्वास आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या