HSRP नंबर प्लेट बसविण्यास मुदतवाढ ! Extension of deadline for installation of HSRP number plates !



मुंबई (प्रति.) : दि.०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.३१/ ०३ / २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ गुरुवार दि. 20 MAR 2025 रोजी परिपत्रक क्र. 18/ २०२५  नुसार महाराष्ट्र राज्याचे  परिवहन आयुक्त  विवेक भीमनवार यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आले आहे. 



सध्या नव्या वाहनांना ती उपलब्ध होते. मात्र, जुन्या वाहनधारकांनी अशा प्रकारची नंबरप्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय९ मोटार ९ वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस HSRP (High Security Registration Plate) बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S. R. ११६२ (E) दि.०४ / १२ / २०१८ व ९.० ६०५२ (E) दि ०६/१२/२०१८ नुसार दि.०१/०४/२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

याबाबत सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी / उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा /टॅक्सी /बस ट्रक संघटनाची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करण्याच्या सूचना हि देण्यात आल्या आहेत. 

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) असा भर Online अर्ज !

खालील link वर क्लिक करा त्यानांतर Online Booking पर्याय दिसेल त्यावर click करा. 

https://transport.maharashtra.gov.in/1035/Home



त्यानंतर नवीन पेज वर Book High Security Registration Plate येथील Book या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

HSRP Online Booking पर्यायावर क्लिक केल्यानंतर Apply High Security Registration Plate Online हा पर्याय दिसेल तिथून
RTO ऑफिस सिलेक्ट करायचे आहे व Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
Book या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Booking Details टाकायच्या आहेत त्यामध्ये राज्य, Registration Number म्हणजे गाडीचा नंबर, Chassis No, Engine No, Mobile No, Captcha टाकून Click Here या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेजवर आपण भरलेली माहिती सर्व बरोबर असेल तर सर्व माहिती तिथे दाखवली जाईल.
त्यानंतर Contact Information मध्ये Owner Name, Email ID, Billing Address टाकून Next पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर आपण जो मोबाइल नंबर दिलाय त्यावर OTP येईल तो टाकून Next पर्यायावर क्लिक करा.
Next पर्यायावर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये Appointment at Affixation Center म्हणजेच Appointment Center आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नंबर प्लेट बसवू शकता किंवा दुसरा ऑपशन म्हणजे Home Delivery त्यामध्ये काही ठराविक जे पिनकोड आहेत त्या ठिकाणी हि सुविधा उपलब्ध आहे.
जर आपण दुसरा ऑपशन सिलेक्ट केला तर त्यामध्ये आपल्याला पिनकोड टाकायचा आहे व Check Availability या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
जर त्या ठिकाणी ही सुविधा नसेल तर खालील Appointment at Affixation Center या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर राज्य, जिल्हा निवडा व Near Me वर क्लिक करून आपल्या जवळील सेंटर वर क्लिक करून Confirm Dealer वरती क्लिक करा.
त्यानंतर राज्य, जिल्हा निवडा व Near Me वर क्लिक करून आपल्या जवळील सेंटर वर क्लिक करून Confirm Dealer वरती क्लिक
करा.
Confirm Dealer वरती क्लिक केल्यानंतर Appointment Date व Time Slot दाखवला जाईल त्यातील योग्य तारीख व वेळ निवडून Confirm & Proceed या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Appointment Details दाखवली जातील ती वाचून Confirm & Proceed या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर Total Cost दाखवली जाईल त्यामध्ये खालील | agree वर क्लिक करून Pay Online या पर्यायावर क्लिक करा. Payment आपण UPI Cards, Netbanking, wallet या माध्यमातून करू शकता.
Payment Done झाल्यानंतर HSRP Appointment Receipt भेटेल ती Save करून ठेवा. व त्या तारखेला ही Receipt आपली गाडी व RC Copy त्या ठिकाणी घेऊन जायची आहे.

-

या लेखात, आम्ही वाहनांना हाय सिक्युरिटी (High Security Registration Plate HSRP) रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंदनकारक; HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. 

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविणे अत्यावश्यक असून मा. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिले आहेत. सदर निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१/०४/२०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्याचा निर्णय घेतला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या