बदललेला रस्ताचं ठेवला खोदुन, वाह रे मनपा प्रशासन... ! The changed road has been dug, wow, the Municipal Administration... !



यात्रे निमीत वाहतुकीत केला बदल...!

चंद्रपूर (वि.प्रति.)

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवी ची यात्रा ३ एप्रिल पासुन प्रारंभ झाली आहे. यात्रेमध्ये तेलंगना, आंध्रप्रदेश इत्यादी परराज्यातुन तर नांदेड, परभणी सारख्या परजिल्ह्यातून या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी मनपा प्रशासनाने सर्वोत्तम व्यवस्था केल्याचा गवगवा प्रसिद्धी माध्यमातुन आणि पोस्टर, बॅनर लावुन मनपा प्रशासन करीत आहे. भाविकांसाठी यावर्षी पहिल्यांदाच गौतमनगर व जवळपासच्या परिसरात राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

महाकाली मंदिर यात्रा काळात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागु नये म्हणून दरवर्षी वाहतुकीत मोठा बदल करण्यात येतो, यावर्षी ही तो बदल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे भिवापुर वार्ड महाकाली वार्ड, बाबूपेठ वार्ड, लालपेठ बार्ड या परिसरात लाखोंच्या नागरिक राहत असतात. त्यांना दळणवळणासाठी एकमेव महाकाली मंदिर परिसारातुन आवाजाही करावी लागते. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येतो.



बदललेला रस्ताचं 
असा ठेवला खोदुन !

वाहतुकीसाठी बदल करण्यात आलेला रस्ताचं खोदून ठेवल्याचा विसर मनपा प्रशासनाला पडलेला दिसतो. शहरातुन पल्याड राहणाऱ्या वस्त्यांमधील नागरिकांसाठी हनुमान खिडकी ते आर. के. चौक (म. फुले चौक) हा रस्ता मनपाने एक आठवड्यापूर्वी खोदून ठेवलेला आहे. शहरातून या रस्त्यावरून आपआपल्या घराकडे जाण्यासाठी दुचाकी स्वारांची मोठी वर्दळ असते, वाहतुक सुरळीत राहावी यासाठी वाहतुक विभागाची एक चौकी या परिसरात वा दरम्यान कार्यरत असते, एवढी वर्दळ या ठिकाणी असते. हनुमान खिडकी ते आर. के. चौक (म. फुले चौक) हा ७ ते ८ फुट चौडाई असलेला रस्ता तिन फुटांच्या जवळपास खोदून लांब पल्ल्यापर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्यांला यात्राकाळात कां बरे खोदून ठेवण्यात आला? याचा प्रश्न नागरिकांना पडत आहे. फोडलेला हा रस्ता मनपा प्रशासन विसरले तर नाही ना? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडत आहे. यात्रा जोमाने भरल्यानंतर या खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना दुर्घटनेला सामोरे जावू नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती व्यवस्था त्वरित करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे.

शहरात खोदलेले रस्ते चंद्रपूरकरांसाठी नवीन विषय नाही, हे नेहमीचेच पण वर्षातून एकदा येणारी आराध्य दैवत महाकाली मातेच्या यात्रेसमोर खोदून ठेवलेला हा रस्ता प्रशासन व बॅनर लावून मिरविणाऱ्या प्रतिनीधिंची असवेंदनशील पणा  दाखविणारा मात्र नक्कीच ठरत आहे. 

CLICK करा हे सुद्धा  वाचा.... 

  गेला रस्ता कुणीकडे...! *खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई... !!

वाहतुकीत बदल :  महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) ब नुसार सार्वजनिक ठिकाणी चंद्रपूर शहरातील रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निमार्ण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये म्हणून ३ ते १३ एप्रिल पर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची अधिसुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केली आहे. सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांकरीता बंद राहील. तसेच अचलेश्वर गेट ते बागला चौक, अचलेश्वर गेट ते कोहीनुर तलावकडे जाणारा रोड व महाकाली मंदीर पार्कींग ते आर के चौक हा नो पार्किंग झोन व नो हॉकर झोन घोषित करण्यात येत आहे. महाकाली मंदीर समोरून गीतम नगरकडे जाणारा रस्ता सर्व वाहनाकरीता बंद राहणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या